बुद्धिबळ
By admin | Published: August 16, 2015 11:44 PM2015-08-16T23:44:32+5:302015-08-16T23:44:32+5:30
राष्ट्रीय चॅलेंजर बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन
Next
र ष्ट्रीय चॅलेंजर बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटननागपूर : ५३ व्या राष्ट्रीय चॅलेंजर बुद्धिबळ २०१५ स्पर्धेचे उद्घाटन रविवारी नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे चेअरमन रवींद्र डोंगरे, ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे, राजू कामदार, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव दिलीप पागे, मुख्य ऑर्बिटर पॉल, सीनिअर कौन्सिलर ॲड. एस.के. मिश्रा, नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष व्ही.के. त्रिवेदी, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज इटकेलवार आदी उपस्थित होते. विश्व फिडे मास्टर दिव्या देशमुख, विश्व ग्रॅण्डमास्टर मृदुल डेहनकर, उदयोन्मुख बुद्धिबळपटू रौनक साधवानी यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दिलीप पागे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव के.के. बारट यांच्यासह उमेश पानबुडे, सप्नील बन्सोड, प्रवीण पानतावणे, आर.एन. श्रीनिवास, एस.एन. पारखी, प्रकाश चहांदे, अनुराग सिंग, दीपक पात्रीकर, निनित कडबे, गोविंद भाके, सिगी वर्गिस, शीतल पानबुडे आदी प्रयत्नशील आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)