बुद्धिबळ चॅलेंजर्स स्पर्धा : विदित गुजराथीला ९ गुणांसह जेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:23 AM2018-01-30T01:23:16+5:302018-01-30T01:23:28+5:30

भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने नेदरलॅँड येथे संपलेल्या टाटा स्टील बुद्धिबळ चॅलेंजर्स स्पर्धेत पाच विजय आणि आठ बरोबरी साधून १३ पैकी नऊ गुण संपादन करून जेतेपद जिंकले.

 Chess Challengers: Vidyut Gujrathithi Champion | बुद्धिबळ चॅलेंजर्स स्पर्धा : विदित गुजराथीला ९ गुणांसह जेतेपद

बुद्धिबळ चॅलेंजर्स स्पर्धा : विदित गुजराथीला ९ गुणांसह जेतेपद

googlenewsNext

चेन्नई : भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने नेदरलॅँड येथे संपलेल्या टाटा स्टील बुद्धिबळ चॅलेंजर्स स्पर्धेत पाच विजय आणि आठ बरोबरी साधून १३ पैकी नऊ गुण संपादन करून जेतेपद जिंकले.
विदित या विजेतेपदामुळे २०१९ च्या मास्टर्स स्पर्धेसाठी पात्र झाला आहे, ज्यामध्ये विश्वविजेता मॅग्नस कार्लसनसह जगातील अव्वल बुद्धिबळपटू सहभागी होणार आहे. विदितचे २७१८ रेटिंग होते आणि त्याला या स्पर्धेत अव्वल मानांकन देण्यात आले होते. त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी इजिप्तचा बासिम अमीन (२६९३ रेटिंग), मायकल क्रेसनकोव्ह (२६७१) आणि युक्रेनचा एंटन कोरबोव्ह (२६५४) होते. या स्पर्धेत विदितला ११ व्या फेरीत कोरबोव्हविरुद्ध चुरशीची लढत द्यावी लागली. हे दोन्ही खेळाडू तोपर्यंत ७.५ गुणांसह बरोबरीत होते. परंतु, विदितने शेवटच्या दोन फेºयांमध्ये १.५ गुण संपादन करून आघाडी घेतली, तर कोरबोव्हला फक्त ०.५ गुण मिळविण्यात यश आले.

हे विजेतेपद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण यामुळे मी २०१९ च्या मास्टर्स गटासाठी पात्र झालो आहे. या विजयामुळे माझा आत्मविश्वाससुद्धावाढला आहे. आता सुरू असलेल्या सरावापेक्षा जास्त मेहनत घेऊन मला आगामी दोन वर्षांत विश्वविजेता व्हायचे आहे.
- विदित गुजराथी

Web Title:  Chess Challengers: Vidyut Gujrathithi Champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.