संस्कृती वानखडे खेळणार जागतिक बुद्धिबळ स्पर्धा

By admin | Published: October 13, 2016 01:05 AM2016-10-13T01:05:15+5:302016-10-13T01:05:15+5:30

बुद्धिबळाच्या सारिपाटावर भल्याभल्यांना मात देणारी अकोल्याची चिमुकली बुद्धिबळपटू संस्कृती संघदास वानखडे ही आता जॉर्जिया येथे १७ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान

Chess World Chess Championship | संस्कृती वानखडे खेळणार जागतिक बुद्धिबळ स्पर्धा

संस्कृती वानखडे खेळणार जागतिक बुद्धिबळ स्पर्धा

Next

अकोला : बुद्धिबळाच्या सारिपाटावर भल्याभल्यांना मात देणारी अकोल्याची चिमुकली बुद्धिबळपटू संस्कृती संघदास वानखडे ही आता जॉर्जिया येथे १७ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान होणार असलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आपली चुणूक दाखविणार आहे. यासाठी सध्या ती पुणे येथे भारताचे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
संस्कृतीने अडीच वर्षांची असताना पहिल्यांदा बुद्धिबळ खेळण्यास प्रारंभ केला. या खेळाप्रती तिचे आकर्षण पाहून तिचे वडील संघदास वानखडे यांनी तिला बुद्धिबळाचे प्राथमिक धडे दिले. त्यानंतर तिला या खेळाचे योग्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्रात पाठविले. अल्पावधीतच संस्कृतीने बुद्धिबळात प्रावीण्य मिळविले. सध्या दहा वर्षांची असलेल्या संस्कृतीने आतापर्यंत श्रीलंका, उझबेकिस्तान, दक्षिण कोरिया, थायलंड, सिंगापूर व मंगोलिया येथे शालेय बुद्धिबळ स्पर्धा गाजवून सुवर्णपदक पटकावले. विदेश दौऱ्यासाठी तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे(बार्टी)चे सहकार्य लाभले आहे. संस्कृती सध्या पुणे येथे ग्रँड मास्टर अभिजित कुंटे व मृणालिनी कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Chess World Chess Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.