Fide World Cup Final- मॅग्नस कार्लसन वर्ल्ड कप विजेता ठरला, भारताचा १८ वर्षीय आर प्रज्ञाननंदा शेवटपर्यंत लढला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 05:14 PM2023-08-24T17:14:21+5:302023-08-24T17:16:35+5:30
Fide World Cup Final R Praggnanandhaa vs Magnus Carlsen : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दिग्गजांना पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचलेल्या १८ वर्षीय आर प्रज्ञाननंदाने जग जिंकणारी कामगिरी केली.
Fide World Cup Final R Praggnanandhaa vs Magnus Carlsen : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दिग्गजांना पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचलेल्या १८ वर्षीय आर प्रज्ञाननंदाने जग जिंकणारी कामगिरी केली. अंतिम सामन्यात त्याला नंबर १ मॅग्नस कार्लसनकडून हार पत्करावी लागली असली तरी 18व्या वर्षी फायनल खेळणे हिच अभिमानास्पद बाब आहे. कार्लसनला त्याने मुख्य फेरीतील दोन्ही लढतीत ड्रॉ वर समाधानी मानण्यास भाग पाडले. पण, कार्लसनने अनुभव पणाला लावताना पहिल्या रॅपिड गेममध्ये बाजी मारून आघाडी घेतली. पण, कार्लसनने दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये पांढल्या मोहऱ्यांनी खेळताना प्रज्ञाननंदाला ड्रॉ मानण्यास भाग पाडले अन् पहिला वर्ल्ड कप उंचावला.
🏆 Magnus Carlsen is the winner of the 2023 FIDE World Cup! 🏆
— International Chess Federation (@FIDE_chess) August 24, 2023
Magnus prevails against Praggnanandhaa in a thrilling tiebreak and adds one more prestigious trophy to his collection! Congratulations! 👏
📷 Stev Bonhage #FIDEWorldCuppic.twitter.com/sUjBdgAb7a
२५-२५ मिनिटांच्या रॅपिड फायर लढतीत प्रज्ञाननंदा शांत डोक्याने एकेक चाल आखली. १८व्या चालीत दोघांनी एकमेकांचे वझीर मारले. कार्लसनने उत्तम बचावाचा नमूना सादर केला. पण, कार्लसनचा निर्धारित वेळ संपत चालला होता आणि त्यामुळे तो दडपणात जाताना दिसला. २५व्या चालीनंतर कार्लसनकडे ४.४८ मिनिटे होती, तर प्रज्ञाननंदाकडे ६ मिनिटांचा अडव्हाटेंज होता.बचावात्मक पवित्र्यात गेलेल्या कार्लसनला २९व्या चालीत प्रज्ञाननंदाने g4चाल करून अचंबित केले. प्रज्ञाननंदाने आक्रमक खेळ केला. ३३व्या चालीत कार्लसनने त्याचा हत्ती भारतीय खेळाडूच्या हत्तीच्या समोर उभा केला. त्याला अपेक्षित चाल प्रज्ञाननंदाने खेळली अन् हत्तीचा बळी देऊन कार्लसनने घोडा वाचवला.
Blog: १८ व्या वर्षी त्याने जगाला दिली टक्कर! प्रज्ञाननंदा सामान्य कुटुंबातील असामान्य मुलगा
पण, आता घड्याळाचे काटे फिरले अन् कार्लसनकडे अडीच मिनिटांचा वेळ शिल्लक होता, तर प्रज्ञाननंदकडे एक मिनिटांहून अधिक वेळ राहिला होता. ४७व्या चालीनंतर प्रज्ञाननंदाने वेळेअभावी डाव सोडला अन् कार्लसनने १ गुणाची कमाई केली. आता पुढील टाय ब्रेकरमध्ये प्रज्ञाननंदाला विजय मिळवावा लागणार आहे. दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये कार्लसनकडे पांढऱ्या मोहऱ्यांचा प्लस पॉईंट होता. प्रज्ञाननंदानेही आक्रमक खेळ करून चांगली टक्कर दिली. पण, भारतीय युवा खेळाडूला वेळेचं गणित अजूनही जमताना दिसत नव्हते. १७व्या चालीत कार्लसनने त्याचा वझीर प्रज्ञाननंदाच्या शेजारीच जाऊन बसवला. ही खूप मोठी चाल होती, कारण प्रज्ञाननंदासाठी हा मस्ट वीन सामना होता.
World no. 1 Magnus Carlsen draws against Praggnanandhaa in the second 25+10 Rapid game, and wins the FIDE World Cup 2023! Since he won the first Rapid game, he defeated Praggnanandhaa 1.5-0.5 in the Rapid tiebreaks.
— ChessBase India (@ChessbaseIndia) August 24, 2023
This is Carlsen's first time winning the World Cup! This was… pic.twitter.com/iJVcTaorbU
प्रज्ञाननंदाने वझीर मारताच कार्लसनने त्याच्या उंटाची चाल चालली अन् भारतीय खेळाडूचा वझीर घेतला. प्रज्ञावर वेळेचं दडपण वाढत चालले. प्रज्ञाननंदाकडे सामना ड्रॉ खेळण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता, तरीही भारतीय चाहत्यांना चमत्काराची अपेक्षा होती. १९व्या चालीनंतर हा सामना ड्रॉ राहिला अन् मॅग्नसने पहिला वर्ल्ड कप जिंकला. प्रज्ञाननंदाला जरी अपयश आले असले तरी त्याची इथपर्यंतची मजल कौतुकास्पद नक्की आहे.
Praggnanandhaa is the runner-up of the 2023 FIDE World Cup! 🥈
— International Chess Federation (@FIDE_chess) August 24, 2023
Congratulations to the 18-year-old Indian prodigy on an impressive tournament! 👏
On his way to the final, Praggnanandhaa beat, among others, world #2 Hikaru Nakamura and #3 Fabiano Caruana! By winning the silver… pic.twitter.com/zJh9wQv5pS