‘शेष भारत’च्या कर्णधारपदी चेतेश्वर पुजारा
By admin | Published: January 15, 2017 04:38 AM2017-01-15T04:38:45+5:302017-01-15T04:38:45+5:30
कसोटीतील तज्ज्ञ खेळाडू चेतेश्वर पुजारा हा २० ते २४ जानेवारीदरम्यान मुंबईत होणाऱ्या इराणी चषकातील शेष भारत संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघाचा सामना पहिल्यांदा
नवी दिल्ली : कसोटीतील तज्ज्ञ खेळाडू चेतेश्वर पुजारा हा २० ते २४ जानेवारीदरम्यान मुंबईत होणाऱ्या इराणी चषकातील शेष भारत संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघाचा सामना पहिल्यांदा रणजी विजेतेपद पटकावलेल्या गुजरातशी होईल.
रिद्धीमान साहा याचा देखील शेष भारताच्या १५ सदस्यांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड विरोधात नोव्हेंबर महिन्यात विशाखापट्टणम येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो पुनरागमन करत आहे.
या संघात करुण नायर याचा देखील समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड विरोधात अखेरच्या कसोटी सामन्यात नायरने त्रिशतक केले होते. या सामन्यात साहा आणि विरोधी संघाचा कर्णधार पार्थिव पटेल यांच्यात एक प्रकारची स्पर्धा दिसेल. साहा जखमी झाल्यानंतर पटेल उर्वरित तीन सामन्यांत भारतीय कसोटी संघातून खेळला होता. रणजीत यंदा सर्वाधिक धावा काढणारा प्रियांक पांचाळ गुजरातकडून खेळणार आहे.
शेष भारत संघ पुढीलप्रमाणे-
अभिनव मुकुंद, अखिल हेरवाडकर, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, मनोज तिवारी, रिद्धीमान साहा, कुलदीप यादव, शाहबाज नदीम, पंकज सिंह, के. विग्नेश, सिद्धार्थ कौल, शार्दुल ठाकूर, अक्षय वाखरे, ईशान किशन, प्रशांत चोपडा.