छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी : मुंबई शहरला दुहेरी मुकुट 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:20 PM2018-12-24T15:20:11+5:302018-12-24T15:21:49+5:30

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत मुंबई शहरने पुरुष आणि महिला या दोन्ही गटाचे जेतेपद मिळवीत दुहेरी यश मिळविले.

Chhatrapati Shivaji Maharaj Kabaddi Kabaddi: team Mumbai city won double crown | छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी : मुंबई शहरला दुहेरी मुकुट 

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी : मुंबई शहरला दुहेरी मुकुट 

ठळक मुद्देमुंबई शहरने पुरुष आणि महिला या दोन्ही गटात जेतेपद पटकावलेमहिला गटात रत्नागिरीवर, तर पुरुष गटात ठाण्यावर विजयविक्रम करणारा मुंबई हा या स्पर्धेतील पहिलाच संघ ठरला

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत मुंबई शहरने पुरुष आणि महिला या दोन्ही गटाचे जेतेपद मिळवीत दुहेरी यश मिळविले. असा विक्रम करणारा मुंबई हा या स्पर्धेतील पहिलाच संघ ठरला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. यांच्यावतीने सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

इस्लामपूर, सांगली येथे जयंत पाटील खुले नाट्यगृहाच्या मैदानावर झालेल्या महिला विभागात मुंबई शहर विरुद्ध रत्नागिरी यांच्यात अंतिम सामना रंगला. त्यात मुंबईने ३१-१७ असा सहज विजय मिळवला. महिला विभागात दबदबा असलेले पुणे, मुंबई उपनगर दोन्ही बलाढ्य संघ बाद फेरीत पराभूत झाले. मुंबई शहर विरुद्ध रत्नागिरी अंतिम सामन्यात मुंबई शहर ने सुरुवाती पासून आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर पकड मिळवली. मध्यंतरा पर्यत १५-०४ अशी भक्कम आघाडी मुंबई शहरने आपल्याकडे राखकी होती. क्षितिजा हिरवे व पूजा यादव यांनी चढाईत चांगला खेळ केला. तर पकडी मध्ये साक्षी रहाटे चमकली. रत्नागिरी कडून चढाईत श्रद्धा पवार व सिमरन यांनी मुंबई शहर ला प्रतिउत्तर देण्याचा चांगला प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. शेवटी मुंबई शहर ने ३१-१७ असा सामना जिंकत विजेतेपद पटाकवले.

पुरुष विभागात मुंबई शहर विरुद्ध ठाणे यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई शहरने ठाण्यावर ३४-३१ असा विजय मिळवीवला. सुरुवाती पासून आक्रमक खेळ करत भक्कम आघाडी मिळवली. ठाणे च्या हुकमी चढाईपटू महेश मोडकरच्या ४ वेळा पकडी करण्यात मुंबई शहर ला यश आले.येथेच ठाण्याची सामन्यावरील पकड ढिली झाली. पकडी मध्ये संतोष वारीक व संकेत सावंतने चांगल्या पकडी केल्या.

मध्यंतरापर्यत मुंबई शहर कडे १८-१० अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर ही मुंबई शहर ने सांघिक खेळ करत आघाडी वाढवली.पण ठाण्याने पुन्हा एकदा कमबॅक केले. एकवेळ १६-३२ असा पिछाडीवर पडलेल्या ठाणे संघाने २९-३४ अशी सामन्यात चुरस वाढवली. महेश मोडकरच्या सुपर रेड ने ठाणे सामन्यांत परत आला. पण मुंबई ने वेळ काढत आपली आघाडी कायम ठेवली.
मुंबईच्या पंकज मोहिते व अजिंक्य कापरे यांनी चढाईत चांगला खेळ केला. ठाणे या सामन्यात सांधिक कामगिरीत कमी पडले. तसेच महेशला अन्य कोणाची साथ लाभली नाही. म्हणूनच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई शहर ने ३४-३१ असा सामना खिशात टाकला.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Kabaddi Kabaddi: team Mumbai city won double crown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी