रणजी स्पर्धेत छत्तीसगडचे ऐतिहासिक विजयी पदार्पण

By Admin | Published: October 9, 2016 04:52 AM2016-10-09T04:52:07+5:302016-10-09T04:52:07+5:30

छत्तीसगडच्या रणजी संघाने पदार्पणाच्या सामन्यात शनिवारी ‘क’ गटात त्रिपुराचा ९ गडी राखून पराभव करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

Chhattisgarh's historic triumph in Ranji Trophy | रणजी स्पर्धेत छत्तीसगडचे ऐतिहासिक विजयी पदार्पण

रणजी स्पर्धेत छत्तीसगडचे ऐतिहासिक विजयी पदार्पण

googlenewsNext

रांची : छत्तीसगडच्या रणजी संघाने पदार्पणाच्या सामन्यात शनिवारी ‘क’ गटात त्रिपुराचा ९ गडी राखून पराभव करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
मोहंमद कैफच्या नेतृत्वाखालील छत्तीसगडने त्रिपुराने विजयासाठी दिलेले १३ धावांचे लक्ष्य एका गड्याच्या मोबदल्यात गाठून तिसऱ्याच दिवशी विजयावर शिक्कामोर्तब केले. त्रिपुराने पहिल्या डावात ११८ आणि दुसऱ्या डावात १४९ धावा केल्या. छत्तीसगडने पहिल्या डावात २५५ धावा केल्यानंतर विजयासाठी आवश्यक १३ धावा करून सामना जिंकला. विजयी संघाचा फलंदाज आशुतोषसिंग याने १४० धावा ठोकताच छत्तीसगडला १३७ धावांची आघाडी मिळाली होती. विजयी लक्ष्य गाठताना रिषभ तिवारी (८) राणा दत्ताच्या चेंडूवर पायचीत होताच छत्तीसगडने बोनस गुण गमावला.
सामना १० गडी राखून जिंकला असता, तर संघाला बोनस गुणाची कमाई करता आली असती. अजय मंडल याने ४, सिन्हा याने २ तसेच नागपूरचा खेळाडू असलेला सुमीत रुईकर याने २ गडी बाद करून मोलाचे योगदान दिले. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Chhattisgarh's historic triumph in Ranji Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.