चिलीने उडवला मेक्सिकोचा धुव्वा
By admin | Published: June 20, 2016 03:13 AM2016-06-20T03:13:19+5:302016-06-20T03:13:19+5:30
एडुआर्डो वारगासच्या शानदार चार गोलच्या बळावर गतचॅम्पियन चिलीने मेक्सिकोचा ७-० ने धुव्वा उडवला. याबरोबरच चिलीने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये धडक दिली.
सेंटा क्लारा (अमेरिका) : एडुआर्डो वारगासच्या शानदार चार गोलच्या बळावर गतचॅम्पियन चिलीने मेक्सिकोचा ७-० ने धुव्वा उडवला. याबरोबरच चिलीने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये धडक दिली. आता चिली
संघाचा सामना बुधवारी कोलंबियाविरुद्ध होईल.
होफेनहेमचा आघाडीपटू वारगास याने १३ व्या मिनिटाच्या आतच हॅट्ट्रिक साधली होती. त्यामुळे चिली संघात जोष भरला होता. त्याने ७४ व्या मिनिटाला चौथा गोल नोंदवित चिलीला ६-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. एडसन पुच याने ८८ व्या मिनिटाला सातवा गोल नोंदवला. याआधी, त्यानेच १६ व्या मिनिटाला आपला गोल नोंदविला होता. वारगास याने हाफटाईमच्या एक मिनिटापूर्वी पहिला गोल नोंदवला. त्यानंतर ५२ व्या आणि ५७ व्या मिनिटाला गोल नोंदवत त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली. एलेक्सिस सांचेज याने ४९ व्या मिनिटाला गोल नोंदवला. या सामन्यात मेक्सिकोचा दबदबा होता. कुक याने कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय गोल १५ व्या मिनिटाला नोंदवला. त्यानंतर ४४ व्या मिनिटापर्यंत गोल होऊ शकला नाही. उभय संघांनी प्रयत्न केले मात्र यश आले नाही. त्यानंतर चिलीने वर्चस्व राखत गोलधडाका सुरू केला.
मेक्सिकोचा मोठा पराभव
या स्पर्धेतील मेक्सिकोचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. याआधी, मेक्सिको संघाला अर्जंेटिनाकडून १९७८ मध्ये विश्वचषक स्पर्धेत पश्चिम जर्मनीकडून ०-६ ने पराभवाचा धक्का बसला होता. त्याआधी, १९६१ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इंग्लंडने ०-८ ने पराभूत केले होते.