चीनकडून भारत पराभूत

By admin | Published: September 10, 2015 12:56 AM2015-09-10T00:56:16+5:302015-09-10T00:56:16+5:30

उत्तर कोरिया व सिंगापूरविरुद्ध मोठा विजय नोंदविणाऱ्या भारतीय ज्युनिअर महिला संघाचा चीनविरुद्ध सातव्या महिला ज्युनिअर एशिया चषक हॉकी स्पर्धेत २-४ गोलने पराभव झाला.

China defeats India | चीनकडून भारत पराभूत

चीनकडून भारत पराभूत

Next

चांगझू : उत्तर कोरिया व सिंगापूरविरुद्ध मोठा विजय नोंदविणाऱ्या भारतीय ज्युनिअर महिला संघाचा चीनविरुद्ध सातव्या महिला ज्युनिअर एशिया चषक हॉकी स्पर्धेत २-४ गोलने पराभव झाला.
चीनने सलग तीन पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून भारतीयांवर दडपण आणले. चीनला सुरुवातीलाच पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण इंदरप्रीत कौरने चीनचे प्रयत्न हाणून पाडले. लगेचच चीनने आक्रमणास सुरुवात केली. त्यांना १०, ११ आणि १५ व्या मिनिटाला लागोपाठ पेनल्टी कॉर्नर मिळाले. यात त्यांनी कोणतीही चूक केली नाही. चीनकडून बिंगफैग गुनेने दोन व कियु गुओने एक गोल केला. ३३ व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जसप्रीतने गोल करून १-३ अशी पिछाडी कमी केली. ५० व्या मिनिटाला चीनच्या चेनयांग गुओने संघाचा चौथा गोल केला. ५६ व्या मिनिटाला गुरजित कौरने संघाचा दुसरा गोल केला.

Web Title: China defeats India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.