ख्रिस गेल, चहल यांना मार्गदर्शनाची गरज नाही: व्हेट्टोरी

By admin | Published: April 19, 2017 07:08 PM2017-04-19T19:08:37+5:302017-04-19T19:08:37+5:30

गुजरातवर 21 धावांनी नोंदविलेल्या विजयात 38 चेंडूत दणादण 77 धावांचे योगदान देणारा ख्रिस गेल तसेच तीन बळी घेणारा युजवेंद्र चहल

Chris Gayle, Chahal need no guidance: Vettori | ख्रिस गेल, चहल यांना मार्गदर्शनाची गरज नाही: व्हेट्टोरी

ख्रिस गेल, चहल यांना मार्गदर्शनाची गरज नाही: व्हेट्टोरी

Next
>ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 19 - गुजरातवर 21 धावांनी नोंदविलेल्या विजयात 38 चेंडूत दणादण 77 धावांचे योगदान देणारा ख्रिस गेल तसेच तीन बळी घेणारा युजवेंद्र चहल यांच्या कामगिरीचे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे कोच डॅनियल व्हेट्टोरी यांनी तोंडभरून  कौतुक केले आहे.  या दोघांसारख्या खेळाडूंना कुठल्याही कोचच्या मार्गदर्शनाची गरज नसल्याचे व्हेट्टोरी म्हणाले.
 
सामन्यानंतर व्हेट्टोरी म्हणाले,‘आंतरराष्ट्रीय खेळाडू हे आपल्या कामगिरीच्या बळावर दादागिरी करतात. ते संघासाठी योगदान देत असतात. त्यांना कुणाच्या स्तुतीची गरज नसते.  गेल हा अशा खेळपट्ट्यांवर कुठल्याही गोलंदाजाचा मारा फोडून काढू शकतो. त्याला आम्ही मोकळेपणाने खेळ असा आधार दिला आहे. ’ चहलचे कौतुक करीत व्हेट्टोरी म्हणाले,‘ मी गेली चार वर्षे चहलवर लक्ष ठेवून आहे. तो मुंबई संघात असताना मी त्याच्याविरुद्ध खेळलोदेखील. चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये देदीप्यमान कामगिरीच्या बळावरच
त्याने मुंबई इंडियन्समध्ये स्थान पटकावले.

Web Title: Chris Gayle, Chahal need no guidance: Vettori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.