ख्रिस गेलचे १२ चेंडूत अर्धशतक

By admin | Published: January 18, 2016 06:33 PM2016-01-18T18:33:01+5:302016-01-18T18:33:01+5:30

वेस्ट इंडिजचा धडाकेबाड फलंदाज ख्रिस गेलने अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या बिग बॅश लीगच्या टी-२० सामन्यात

Chris Gayle hit half-century in 12 balls | ख्रिस गेलचे १२ चेंडूत अर्धशतक

ख्रिस गेलचे १२ चेंडूत अर्धशतक

Next
>ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. १८ -  वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या बिग बॅश लीगच्या टी-२० सामन्यात ख्रिस गेलने १७ चेंडूत ५६ धावा केल्या.
टी-२० सामन्यात सर्वाधिक जलद अर्शधतक करणारा भारतीय फलंदाज युवराज सिंगची ख्रिस गेलने बरोबरी केली. युवराज सिंगने २००७ साली दक्षिण ऑफ्रिकेमध्ये झालेल्या वर्ल्ड टी-२० सामन्यात इंग्लडविरुद्ध १६ चेंडूत ५८ धावा केल्या होत्या. 
बिग बॅश लीगच्या टी-२० सामन्यात ख्रिस गेलने २६ मिनिटांत सात षटकारांसह दोन चौकार लगावत १७ चेंडूत ५६ धावा केल्या असून त्याच्या नावाची सर्वाधिक जलद अर्धशतक करणारा फलंदाज म्हणून नोंद करण्यात आली आहे.   

Web Title: Chris Gayle hit half-century in 12 balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.