ख्रिस गेल "रिटर्न्स", विराट येणार सलामीला ?
By Admin | Published: July 9, 2017 02:34 PM2017-07-09T14:34:28+5:302017-07-09T14:34:28+5:30
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज रविवारी खेळल्या जाणाऱ्या एकमेव टी-२० लढतीसाठी वेस्ट इंडिजने तुफानी ख्रिस गेल याला संघात स्थान दिले आहे.
>ऑनलाइन लोकमत
किंग्जस्टन, दि. 9 - भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज रविवारी खेळल्या जाणाऱ्या एकमेव टी-२० लढतीसाठी वेस्ट इंडिजने तुफानी ख्रिस गेल याला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे विंडीजच्या संघाची ताकद वाढली असल्याचं मानलं जात असलं तरीही सामन्यात भारताचं पारडं जड राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहली सलामीवीराची भूमिका बजावेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या एकमेव टी-२०साठी भारतीय संघ भारतीय संघ डावपेच व संघ यात बदल करू शकतो. एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे ही जोडी सलामीला आली. या एकमेव टी-20त विराट कोहली सलामीला येण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून कोहली सलामीला येतो.
युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला या दौऱ्यात प्रथमच संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भविष्यातील वन-डे यष्टिरक्षक म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. पाच सामन्यांची वन-डे मालिका ३-१ अशी जिंकणाऱ्या भारताला टी-२० जिंकून मालिकेचा शानदार समारोप करायचा आहे. यासाठी ख्रिस गेलच्या फलंदाजीवर अंकुश लावावा लागेल. खराब फॉर्म आणि जखमांशी झुंज देणारा गेल 15 महिन्यांनंतर राष्ट्रीय संघात परतला. आयपीएलमध्येहीतो अपयशी ठरला होता.
विंडीज संघ या प्रकारात सध्या विश्वविजेता असून संघात गेलसह मार्लोन सॅम्युअल्स, सुनील नारायण, सॅम्युअल बद्रीसारखे मॅचविनर आहेत. टी-२० चा तज्ज्ञ कार्लोस ब्रेथवेट कर्णधार असेल. मागच्या वर्षी फ्लोरिडात भारताविरुद्धच्या टी-२० त ४९ चेंडूंत शतक झळकविणारा एव्हिन लुईस याचादेखील संघात समावेश आहे. या लढतीसाठी भारतीय संघ डावपेच व संघ यात बदल करू शकतो. रोहितच्या अनुपस्थितीत कोहली सलामीला खेळण्याची शक्यता आहे. युवा ऋषभ पंतला दौऱ्यात प्रथमच संधी दिली जाईल. भविष्यातील वन-डे यष्टिरक्षक म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. कुलदीप यादवदेखील संघात असेल. तो वेगवान भुवनेश्वर व उमेश यादवनंतर फिरकीची बाजू सांभाळेल. विंडीजच्या आक्रमणाची भिस्त नारायण व बद्रीवर राहील. नारायण फलंदाजीत सलामीला खेळू शकतो.
उभय संघ असे...
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, युवराजसिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, दिनेश कार्तिक आणि मोहम्मद शमी.
वेस्ट इंडीज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), सॅम्युअल बद्री, रोन्सफोर्ड बीटन, ख्रिस गेल, एव्हिन लुईस, जेसन मोहम्मद, सुनील नारायण, किरॉन पोलार्ड, रोवमॅन पॉवेल, मार्लोन सॅम्युअल्स, जेरोम टेलर, चाडविक वॉल्टन, केसरिक विल्यम्स.
स्थळ : सबीना पार्क, किंग्जस्टन, जमैका
सामन्याची वेळ : रात्री ९ वाजल्यापासून