गंभीर भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी दावेदार
By admin | Published: April 30, 2017 02:03 AM2017-04-30T02:03:17+5:302017-04-30T02:03:17+5:30
गौतम गंभीर आयपीएलच्या दहाव्या पर्वात कामगिरीत सातत्य राखणारा खेळाडू आहे. तो नैसर्गिक फलंदाजी करीत आहे. चेंडू त्याच्या बॅटवर आदळल्यानंतर धाव नक्की मिळत
- रवी शास्त्री लिहितात...
गौतम गंभीर आयपीएलच्या दहाव्या पर्वात कामगिरीत सातत्य राखणारा खेळाडू आहे. तो नैसर्गिक फलंदाजी करीत आहे. चेंडू त्याच्या बॅटवर आदळल्यानंतर धाव नक्की मिळत आहे. तो कर्णधार म्हणून खेळत आहे, ही वेगळी बाब. त्याने सुनील नरेनला सलामीला खेळविण्याचा धाडसी व शानदार निर्णय घेतला. डावाच्या १८व्या षटकात धोनीविरुद्ध त्याने कुलदीप यादवला गोलंदाजीला पाचारण केले. त्याचसोबत त्याने उथप्पावरील विश्वास कायम ठेवला. त्याला आपल्या खेळाडूंवर विश्वास आहे. त्यासाठी मनीष पांडे व युसूफ पठाण यांचे उदाहरण देता येईल. स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध त्याने नरेनला गोलंदाजीची संधीच दिली नाही. केकेआरचा संघ मैदानात असताना त्यांच्याविरुद्ध दुहेरी धावा घेणे सोपे काम नसते.
एका फलंदाज म्हणून गंभीरला रोखणे कठीण भासत आहे. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके व चौकार लगावले आहेत. तो शानदार कट शॉट खेळत आहे. चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेला फटकावून धावा वसूल करीत आहे. त्याने आतापर्यंत केवळ एकमेव षटकार ठोकला आहे. त्यावरून खेळपट्टीवर अन्य पर्यायांचा वापर करण्यास पसंती देत असल्याचे द्योतक आहे. त्याला एका
टोकावर रोखून ठेवणे प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी आव्हान ठरत
आहे.
त्याने आपल्या स्टान्समध्ये थोडा बदल केला आहे. तो आता अधिक ओपन शोल्डर स्टान्स घेतो. कुठल्याही फलंदाजासाठी आपल्या फलंदाजी तंत्रात बदल करणे कठीण काम असते.
गंभीर निश्चित टीम इंडियामध्ये स्थान मिळविण्याचा दावा करण्याचा हकदार आहे. के. एल. राहुल चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीला खेळलेला नाही, तर शिखर धवन त्यासाठी वॉर्मअप करीत आहे. जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तर ३४ वर्षीय गंभीर चांगला पर्याय ठरू शकतो. या पर्यायाने आता आणखी वेग धरला आहे. (टीसीएम)