आॅस्ट्रेलियन ओपनवरही संशयाचे ढग
By admin | Published: January 20, 2016 03:03 AM2016-01-20T03:03:18+5:302016-01-20T03:03:18+5:30
जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचनंतर अनेक टेनिसपटूंनी फिक्सिंगसाठी संपर्क साधला गेला होता, अशी कबुली दिली आहे.
मेलबोर्न : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचनंतर अनेक टेनिसपटूंनी फिक्सिंगसाठी संपर्क साधला गेला होता, अशी कबुली दिली आहे. त्यामुळे वर्षातील पहिली ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा आॅस्ट्रेलियन ओपनबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सर्बियन खेळाडूने फिक्सिंगसाठी त्याच्यासोबत संपर्क करण्यात आला होता, असे स्पष्ट केले. टेनिसमध्ये फिक्सिंग व भ्रष्टाचाराबाबत सर्वांत मोठा दावा करण्यात आल्यानंतर मंगळवारी टेनिसपटू थानासी कोकिनाकिसने सोशल नेटवर्किंग साईटद्वारे त्याला फिक्सिंगचा प्रस्ताव देण्यात आला होता असे स्पष्ट केले, तर आॅस्ट्रेलियाच्या डेव्हिस कप संघातील माजी सदस्याने त्याला एकदा सामना गमावण्यासाठी मोठ्या रकमेचा लिफाफा दिल्याचे सांगितले.
आॅस्ट्रेलियन मीडियाच्या मते मेलबोर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या आॅस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीच्या काही निकालांवर संशय आल्यानंतर संशयाच्या घेऱ्यातील व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत. बीबीसीने अव्वल ५० पैकी १६ खेळाडूंनी संघर्ष न करता पराभव स्वीकारला असल्याचा दावा पुराव्यासह केला. बजफीडच्या मते ‘आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये एकेरी व दुहेरीत अनेक निकाल संशयाच्या घेऱ्यात आहेत.’ क्रीडावर्तुळात क्रिकेट व फुटबॉलनंतर टेनिसमध्ये फिक्सिंगचे हे सर्वांत मोठे प्रकरण आहे.भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत पारदर्शिता असावी : मरे
मेलबोर्न : अॅन्डी मरेने टेनिस महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढतीत सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले आहे. त्याने आॅस्ट्रेलियन ओपन पुरस्कृत करण्याचे अधिकार एका सट्टेबाजी करणाऱ्या कंपनीला देण्याच्या निर्णयावर टीका केली. बीबीसी आणि बजफीडतर्फे टेनिसमध्ये फिक्सिंग होत असल्याचा दावा करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर मरेने