Corona Virus : मुख्यमंत्र्यांचा एक फोन अन् दोन घासांसाठी झगडणाऱ्या धावपटूच्या मदतीला धावले शिवसैनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:51 PM2020-05-19T17:51:46+5:302020-05-19T17:52:58+5:30

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या धावपटूवर उपासमारीची वेळ आली होती.

CM Uddhav Thackeray help runner prajakta godbole, who was fighting for hunger svg | Corona Virus : मुख्यमंत्र्यांचा एक फोन अन् दोन घासांसाठी झगडणाऱ्या धावपटूच्या मदतीला धावले शिवसैनिक

Corona Virus : मुख्यमंत्र्यांचा एक फोन अन् दोन घासांसाठी झगडणाऱ्या धावपटूच्या मदतीला धावले शिवसैनिक

googlenewsNext

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या धावपटूवर उपासमारीची वेळ आली होती. वडीलांना अर्धांगवायूचा झटका आणि त्यात लॉकडाऊमुळे आईवर बेरोजगारीची आलेली कुऱ्हाड यामुळे भारताच्या उदयोन्मुख धावपटू प्राजक्ता गोडबोले आणि तिच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली होती. तिच्याकडे एकवेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते. हे वृत्त समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या शिवसैनिकांना फोन केला अन् प्राजक्ताला मदत करण्याच्या सूचना केल्या. 

24 वर्षीय प्राजक्ता नागपूरच्या सिरासपेठ येथे एका झोपडीत आपल्या आई-वडीलांसह राहते. तिचे वडील विलास गोडबोले सुरक्षारक्षक होते, परंतु त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. तिची आई अरुणा जेवण बनवण्याचं काम करून महिन्याला 5 ते 6 हजार रुपये कमावते. पण, लॉकडाऊनमुळे लग्न कार्य होत नसल्यानं गोडबोले कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे.   

प्राजक्ता म्हणाली,''शेजाऱ्यांकडून मिळणाऱ्या मदतीवर आम्ही अवलंबून आहोत. ते आम्हाला तांदूळ, डाळ आणि काही वस्तू देत आहेत. त्यामुळे दोन-तीन दिवसांचा प्रश्न सुटतो, परंतु पुढे काय मांडलंय याची कल्पना नाही. आमच्यासाठी लॉकडाऊन क्रूर ठरत आहे. मी सरावाचाही विचार करत नाही. अशा परिस्थितीत जगायचं कसं? लॉकडाऊननं आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं.''

या परिस्थितीत नक्की काय करावं, कुणाकडे मदत मागावी हेही प्राजक्ताला कळेनासे झाले आहे. ''काय करावं हेच कळत नाही. आई-वडीलही काहीच करू शकत नाही. लॉकडाऊन लवकर संपावा यासाठी आम्ही केवळ प्रार्थना करत आहोत.'' 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन अन् मदतीसाठी धावले शिवसैनिक
शिवसेनेचे नागपूर शहर प्रमुख प्रकाश जाधव यांनी पीटीआयला सांगितले की,''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्राजक्ताच्या परिस्थितीबाबत समजलं तेव्हा त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तिला मदत करण्याच्या सूचना केल्या. काही दिवसांपूर्वी आम्ही तिला राशन आणि 16 हजार रुपये दिले. आम्ही तिच्या संपर्कात आहोत आणि तिला शक्य होईल तितकी मदत करू.'' 

प्राजक्तानं 2019मध्ये इटलीत झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत 5000 मीटर शर्यतीत भारतीय विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलं होतं. त्यात तिला 18:23.92 सेकंदाची वेळ नोंदवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचा होता, परंतु ती अपयशी ठरली. या वर्षाच्या सुरुवातीला तिनं टाटा स्टील भुवनेश्वर अर्ध मॅरेथॉनमध्ये 1:33:05 च्या वेळेसह दुसरे स्थान पटकावले. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला; कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात काश्मीर संघाचे नेतृत्व करायचे आहे!

प्रेक्षकांविना खेळणे म्हणजे, वधुशिवाय विवाह करणे; शोएब अख्तर

मित्रानं वाचवलं नसतं, तर जीव गेलाच होता; विराट कोहलीनं सांगितला थरारक प्रसंग

जगातील सर्वोत्तम खेळाडूला कन्यारत्न; पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Hot and Beauty; 'या' टेनिसपटूसोबत डेटवर जाण्यासाठी चाहत्यानं मोजले चक्क 7 कोटी!

Web Title: CM Uddhav Thackeray help runner prajakta godbole, who was fighting for hunger svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.