सीओएने घेतली संघ व्यवस्थापनाची भेट
By Admin | Published: March 10, 2017 06:23 AM2017-03-10T06:23:47+5:302017-03-10T06:23:47+5:30
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने(सीओए) बंगळुरु येथे झालेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे कोच अनिल कुंबळे आणि त्यांच्या सहायक
नवी दिल्ली : बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने(सीओए) बंगळुरु येथे झालेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे कोच अनिल कुंबळे आणि त्यांच्या सहायक स्टाफची भेट घेतली.
याप्रसंगी सीओए प्रमुख विनोद राय यांच्यासोबत डायना एडलजी आणि रामचंद्र गुहा उपस्थित होते. चर्चेत सहायक कोच आर. श्रीधर तसेच संजय बांगर सहभागी झाले होते. कुंबळे यांना राष्ट्रीय संघ, महिला संघ आणि ज्युनियर क्रिकेटचा प्रगती अहवाल तयार करण्याची समितीने सूचना केली.
भारतीय खेळाडूंचा केंद्रीय करार, सहयोगी स्टाफ यावर चर्चा झाली. सहयोगी स्टाफला वेतनवाढ हवी
आहे, अशी माहिती कुंबळे यांनी समितीला दिली. ही बैठक ३० मिनिटे चालली. कुंबळे यांनी सर्व माहिती समितीला दिली.
आॅस्ट्रेलियाविरुद्धची सध्याची मालिका आटोपताच सविस्तर अहवाल सादर करण्यात येईल, असे कुंबळेने बैठकीनंतर सांगितले. सीओए प्रमुख विनोद राय यांनी कर्णधार विराट कोहली आणि ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष व्यंकटेश
प्रसाद यांच्यासोबत वेगळी बैठक घेतल्याची माहिती आहे. सीओएची पुढील बैठक १७ मार्च रोजी नवी दिल्लीत होईल. (वृत्तसंस्था)