डायमंड लीगमध्ये कोलमनवर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:12 AM2018-07-21T04:12:05+5:302018-07-21T04:12:50+5:30
उसेन बोल्टच्या निवृत्तीनंतर लंडनमध्ये होणाऱ्या डायमंड लीगमध्ये विश्व इनडोअर ६० मीटर चॅम्पियन ख्रिस्तियन कोलमनकडे सर्वांचे लक्ष आहे.
लंडन : उसेन बोल्टच्या निवृत्तीनंतर लंडनमध्ये होणाऱ्या डायमंड लीगमध्ये विश्व इनडोअर ६० मीटर चॅम्पियन ख्रिस्तियन कोलमनकडे सर्वांचे लक्ष आहे. लीगमध्ये १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आपली छाप सोडण्यावर त्याचे लक्ष आहे.गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये लंडन स्टेडियममध्ये विश्व चॅम्पियनशिप सेमी फायनलमध्ये २२ वर्षीय धावपटूने १०० मीटर शर्यतीत बोल्टच्या चार वर्षांच्या अजेय अभियानाला रोखले होते.मॅरीस ग्रीनचा १९ वर्षे जुना विश्व इनडोअर विक्रम फेब्रुवारीत मोडल्यावर आता कोलमनचे लक्ष्य १०० मीटरमध्ये विक्रम करण्यावर असेल. तो २०१६ रियो आॅलिम्पिकनंतर १०० मीटरचा जगातील सर्वांत वेगवान धावपटू आहे. गेल्या वर्षी त्याने अमेरिकेमध्ये ९.८२ सेकंदांचा विक्रम केला होता. १०० मीटरमध्ये अमेरिकेचा कॅमरेन बुरेल, २०११ चा विश्व चॅम्पियनशिप योहान ब्लॅक, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रकुल विजेता अकानी सिम्बाइन आणि ब्रिटनच्या रिसे प्रेसकोड यांचा समावेश आहे.400 मीटर पुरुषांच्या शर्यतीत ग्रेनाडाच्या किरानी जेम्सला पुनरागमन करावे लागेल. त्याने आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. महिलांमध्ये २०० मीटर शर्यतीत जमैकाची आॅलिम्पिक चॅम्पियन एलेने थॉम्पसन आणि नेदरलॅण्डची विश्वविजेती डाफने शिपर्सवर सर्वांचे लक्ष असेल.