जलतरण तलावातील फिल्ट्रेशन प्लॅन्ट महिनाभरात सुरू करा जिल्हाधिकारी : तालुका क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरित करा

By admin | Published: August 10, 2016 10:03 PM2016-08-10T22:03:48+5:302016-08-10T22:03:48+5:30

जळगाव - जिल्हा क्रीडा संकुलातील विविध सुविधांचा लाभ नवोदित खेळाडुंना देऊन त्यांच्यातून चांगले व दर्जेदार खेळाडु घडवा. तसेच जलतरण तलावातील फिल्ट्रेशन प्लॅन्ट महिनाभरात सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी बुधवारी जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती व जिल्हा क्रीडा परिषदेच्या बैठकीत दिले.

Collectorate: Transfer to Taluka Sports Complex, to start Swimming Pool Filtration Plant in a month. | जलतरण तलावातील फिल्ट्रेशन प्लॅन्ट महिनाभरात सुरू करा जिल्हाधिकारी : तालुका क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरित करा

जलतरण तलावातील फिल्ट्रेशन प्लॅन्ट महिनाभरात सुरू करा जिल्हाधिकारी : तालुका क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरित करा

Next
गाव - जिल्हा क्रीडा संकुलातील विविध सुविधांचा लाभ नवोदित खेळाडुंना देऊन त्यांच्यातून चांगले व दर्जेदार खेळाडु घडवा. तसेच जलतरण तलावातील फिल्ट्रेशन प्लॅन्ट महिनाभरात सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी बुधवारी जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती व जिल्हा क्रीडा परिषदेच्या बैठकीत दिले.
जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती व जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी सचिन ओम्बासे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे, क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा सोनवणे उपस्थित होते.
महिनाभरात फिल्ट्रेशन प्लॅण्ट बसवा
यावेळी जैन स्पोर्टस् ॲकॅडमीला महिनाभरात क्रीडा संकुलातील जलतरण तलावात फिल्ट्रेशन प्लॅन्ट बसविण्याची सूचना करण्यात आली. रिक्त गाळ्यांचे लिलाव प्रक्रिया, जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विषयांना मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हा क्रीडा संकुलासाठी सफाई कामगार एजन्सी नेमणेसाठी टेंडर प्रक्रिया राबवावी अशी सूचना देण्यात आली. तसेच गाळा हस्तांतरण प्रस्तावासंदर्भात मूळ कराराची कागदपत्रे पाहुन निर्णय घेण्याबाबत ठरले.
कर्मचार्‍यांना १५ टक्के पगारवाढ
संकुलातील कर्मचार्‍यांना १५ टक्के पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला. ज्या तालुक्यात तालुका क्रीडासंकुले तयार आहेत, ती हस्तांतरित करून, तालुकास्तरीय समितीकडे नियोजनासाठी सोपवावे असे आदेश त्यांनी दिले. तालुकास्तरावर विशिष्ट खेळांसाठी सुविधा असलेली मैदाने असावीत, अशा सूचना यावेळी दिली. जिल्‘ातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी विविध क्रीडा संघटनांना सोबत घेऊन नावीण्यपूर्ण उपक्रम राबवावे व जिल्‘ातून अधिकाधिक दर्जेदार खेळाडू निर्माण करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले. दर्जेदार खेळाडु घडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मांडली. यावेळी जिल्हा क्रीडा संकुलाचा मासिक उत्पन्न व खर्च सादर करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Collectorate: Transfer to Taluka Sports Complex, to start Swimming Pool Filtration Plant in a month.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.