दोन ‘सुपरस्टार’ एकत्र
By Admin | Published: March 30, 2016 02:49 AM2016-03-30T02:49:37+5:302016-03-30T02:49:37+5:30
टी-२० विश्वचषक स्पर्धा अखेरच्या टप्प्यामध्ये आली असून मुंबईत गुरुवारी होणाऱ्या भारत वि. वेस्ट इंडिज सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, त्याआधी बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ अमिताभ
मुंबई : टी-२० विश्वचषक स्पर्धा अखेरच्या टप्प्यामध्ये आली असून मुंबईत गुरुवारी होणाऱ्या भारत वि. वेस्ट इंडिज सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, त्याआधी बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन आणि क्रिकेटचा ‘गॉडझिला’ ख्रिस गेल यांनी एकत्र येताना दमदार पार्टी केली. यानिमित्ताने दोन क्षेत्रातील ‘अँग्री यंग मॅन’ एकत्रित आले.
अमिताभ यांनी ट्विटरवर फोटो टाकून गेलसह झालेल्या या भेटीची माहिती दिली. अमिताभ यांनी सांगितले, ‘‘ख्रिस गेल मी दिलेल्या निमंत्रणावरून माझ्या घरी आला. तो माझा चाहता असल्याचे मला ठावूक नव्हते. मी त्याचा योग्य पाहुणचार करताना त्याची पूर्ण काळजी घेतली.’’ या भेटी दरम्यान अमिताभ यांनी गेलला आपले एक पुस्तकही भेट दिले.
दुसऱ्या बाजूला गेलने अमिताभ यांना ‘लिजेंड’ असे सांगताना म्हटले, ‘‘अमिताभ खरेखुरे लिजेंड आहेत. घरी निमंत्रित करण्यासाठी आणि शानदार पाहुणचार केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पुस्तक दिल्यासाठीही धन्यवाद. त्यांची इच्छा आहे की, उपांत्य फेरीत मी शतक ठोकावं मात्र सामना भारताने जिंकावा.’’ (वृत्तसंस्था)