अंजली भागवत, रासक्निहा करणार आॅलिम्पिकमध्ये समालोचन

By admin | Published: July 11, 2016 09:37 PM2016-07-11T21:37:01+5:302016-07-11T21:37:01+5:30

प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत आणि हॉकी संघाचा कर्णधार वीरेन रासकिन्हा हे रिओ आॅलिम्पिकसाठी स्टार स्पोर्टस् हिंदी चॅनेलवर हिंदीतून समालोचन करणार आहेत.

Commentary on Anjali Bhagwat, Raskinha to the Olympics | अंजली भागवत, रासक्निहा करणार आॅलिम्पिकमध्ये समालोचन

अंजली भागवत, रासक्निहा करणार आॅलिम्पिकमध्ये समालोचन

Next


ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11- प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत आणि हॉकी संघाचा कर्णधार वीरेन रासकिन्हा हे रिओ आॅलिम्पिकसाठी स्टार स्पोर्टस् हिंदी चॅनेलवर हिंदीतून समालोचन करणार आहेत. याची घोषणा सोमवारी करण्यात आली.
अर्जुन पुरस्कारप्राप्त रासकिन्हा याने भारताकडून १८0 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्याने अ‍ॅथेन्स आॅलिम्पिक २00४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अंजली भागवत २00२ मध्ये दहा मीटर एअर रायफलमध्ये जगातील नंबर वन नेमबाज बनली होती. तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५५ सुवर्ण, ३५ रौप्य आणि १६ कास्यपदके जिंकली आहेत.
या दोघांशिवाय हिंदी समालोचकांच्या पॅनलमध्ये अन्य तज्ज्ञ भारतीय डेव्हिस चषक प्रशिक्षक नंदन बाळ, माजी पहिलवान जगदीश कालीरमन, भारतीय तिरंदाज प्रशिक्षक संजीव, माजी बॅडमिंटनपटू निर्मला कोटनीस, जिम्नॅस्ट पूजा सुर्वे आणि माजी बॉक्सर राजकुमार सांगवान यांचाही समावेश आहे.

Web Title: Commentary on Anjali Bhagwat, Raskinha to the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.