Commonwealth Games 2018: जय 'बजरंग' बली; कुस्तीपटू बजरंग पुनियाचा 'सोनेरी' धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 01:45 PM2018-04-13T13:45:00+5:302018-04-13T13:59:35+5:30

बजरंगकडून प्रतिस्पर्ध्याचा १०-० असा धुव्वा

Commonwealth Games 2018 Bajrang Punia wins Gold in mens 65 kg freestyle | Commonwealth Games 2018: जय 'बजरंग' बली; कुस्तीपटू बजरंग पुनियाचा 'सोनेरी' धोबीपछाड

Commonwealth Games 2018: जय 'बजरंग' बली; कुस्तीपटू बजरंग पुनियाचा 'सोनेरी' धोबीपछाड

Next

गोल्डकोस्ट: राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंची वजनदार कामगिरी सुरुच आहे. ६५ किलो फ्रीस्टाईल प्रकारात बजंरग पुनियानं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. बजरंग पुनियानं वेल्सच्या केन चॅरिगचा १०-० असा धुव्वा उडवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.  तांत्रिक गुणांच्या जोरावर बजरंगनं प्रतिस्पर्ध्याला चीतपट केलं. बजरंगच्या या सोनेरी कामगिरीमुळे भारताला स्पर्धेतील सतरावं सुवर्णपक जिंकलं.

नेमबाज, कुस्तीपटूंनी यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे पदकांची लूट केली आहे. राहुल आवारे आणि सुशील कुमारनं काल (गुरुवारी) कुस्तीमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली होती. यानंतर आज बजरंग पुनियानं सोनेरी कामगिरी केली. अंतिम फेरीत बजरंगनं प्रतिस्पर्धी केनला कोणतीही संधी दिली नाही. बजरंगचा खेळ इतका सफाईदार होता की, प्रतिस्पर्धी खेळाडूला गुणांचं खातंदेखील उघडता आलं नाही. बजरंगनं तांत्रिक गुणांच्या जोरावर १० मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आणि भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलं. 

अंतिम फेरीत संपूर्ण वर्चस्व गाजवणाऱ्या बजरंगची यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरी अतिशय शानदार ठरली आहे. बजरंगनं स्पर्धेतील तीन लढतींमध्ये प्रतिस्पर्ध्यांना एकही गुण मिळवू दिला नाही. त्यानं न्यूझीलंडच्या ब्राहम रिचर्ड्स, नायजेरियाच्या अॅमस डॅनिअल्स आणि कॅनडाच्या विन्संट डी मरिनिस यांच्याविरुद्धच्या लढतींमध्ये संपूर्ण वर्चस्व गाजवलं. या तिन्ही खेळाडूंना बजरंगनं एकाही गुणाची कमाई करु दिली नाही. २४ वर्षाच्या बजरंगनं याआधी २०१४ मध्ये ग्लास्गोत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं होतं. याशिवाय २०१३ मध्ये बुडापेस्टमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ६० किलो गटात त्यांन कांस्यपदक जिंकलं होतं. 

Web Title: Commonwealth Games 2018 Bajrang Punia wins Gold in mens 65 kg freestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.