Commonwealth Games 2018:नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सर गौरव सोळंकी व कुस्तीपटू सुमित मलिकने केली सुवर्ण पदकाची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 09:43 AM2018-04-14T09:43:28+5:302018-04-14T09:43:28+5:30

भारताच्या खात्यात आता एकुण 21 सुवर्णपदकं जमा झाली आहेत. 

Commonwealth Games 2018: Gaurav Solanki, Sanjeev Rajput, Sumit malik claims gold | Commonwealth Games 2018:नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सर गौरव सोळंकी व कुस्तीपटू सुमित मलिकने केली सुवर्ण पदकाची कमाई

Commonwealth Games 2018:नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सर गौरव सोळंकी व कुस्तीपटू सुमित मलिकने केली सुवर्ण पदकाची कमाई

Next

गोल्ड कोस्ट- शनिवारची सकाळ भारताला सुवर्ण कमाई करून देणारी सकाळ ठरते आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या खेळाची सुरूवात झाल्यापासून भारताने एकुण चार सुवर्णपदकांवर नावं कोरलं आहे. पहिले बॉक्सिंगमध्ये मेरी कॉमने सुवर्णपदक पटकाविल्यानंतर आता नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सिंगमध्ये गौरव सोळंकी आणि कुस्तीपटू सुमित मलिकने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

भारतीय नेमबाज संजीव राजपूतने पुरूषांच्या 50 मीटर 3 रायफल पोजिशनमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. बॉक्सिंगप्रकारात गौरव सोळंकीने पुरूषांच्या 52 किलोवजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली.  उत्तर आयर्लंडचा ब्रेंडन इरविनचा पराभव करत गौरवने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. तर कुस्तीपटू सुमित मलिकने यशस्वी कामगिरी करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात आता एकुण 21 सुवर्णपदकं जमा झाली आहेत. 
 

Web Title: Commonwealth Games 2018: Gaurav Solanki, Sanjeev Rajput, Sumit malik claims gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.