Commonwealth Games 2018: टेबल टेनिसमध्ये भारताने पटकावले सुवर्णपदक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 04:16 PM2018-04-09T16:16:41+5:302018-04-09T16:28:04+5:30

भारतीय पुरुष संघाने बलाढ्य नायजेरीयाला 3-0 असे नमवत टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली.

Commonwealth Games 2018: India beat Nigeria 3-0 to win gold in Men's Team event | Commonwealth Games 2018: टेबल टेनिसमध्ये भारताने पटकावले सुवर्णपदक 

Commonwealth Games 2018: टेबल टेनिसमध्ये भारताने पटकावले सुवर्णपदक 

Next

गोल्डकोस्ट - राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले आहे. या पदकासह भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या आता 9 झाली आहे.  भारतीय पुरुष संघाने बलाढ्य नायजेरीयाला 3-0 असे नमवत टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. साथियान/ हरमीत देसाई या जोडीने नायजेरीयाचा 10-12, 11-3, 11-3, 11-4  आशा सरळ फरकाने पराभव करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. 

राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताने सहावे पदक पटकावले. भारताच्या पदकाची संख्या आता 18 झाली आहे. यामध्ये 9 सुवर्णपदकाचा समावेश आहे. शरथ कमलने टेबल टेनिसच्या अंतिम सामन्यात बोडे एबियोडुनचा 4-11, 11-5, 11-4 आणि 11-9 ने प्रथम सिंगल्समध्ये पराभव केला. त्यानंतर साथियानने भारतला 2-0ची आघाडी मिळवूून दिली. साथियान/ हरमीत देसाई या जोडीने 2-0 ची ही आघाडी 3-0 करत भारताला आणखी एक गोल्ड मिळवून दिले. 

पहिल्या सामन्यात अचंता शरथ कमलनं बोडे अॅबिओदूनला ४-११, ११-५, ११-४, ११-९ अशा गुणफरकानं हरवलं. तर साथियान गणासेकरननं सेगुन तोरिओला १०-१२, ११-३, ११-३, ११-४ अशा गुणफरकानं नमवून भारताला २-० ने आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दुहेरीत हरमीत देसाई आणि साथियान यानं अॅबिओदून-ओमोतायो जोडीला ११-८, ११-५ आणि११-३ अशा गुणफरकानं नमवून सुवर्णपदकावर नाव कोरलं. 

काल भारतीय महिलांनी धडाकेबाज कामगिरी करत सिंगापूरच्या महिलांवर अंतिम फेरीत मात करत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याच कामगिरीचा कित्ता गिरवत भारतीय पुरुष संघाने गिरवला आहे. 

Web Title: Commonwealth Games 2018: India beat Nigeria 3-0 to win gold in Men's Team event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.