Commonwealth Games 2018 : डोपिंगमधून भारताला मिळाली क्लीन चिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 02:35 AM2018-04-03T02:35:28+5:302018-04-03T02:35:28+5:30

सिरिंंज प्रकरणात भारताला मोठा दिलासा लाभला. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने भारतीय मुष्टीयोध्यांना डोपिंगप्रकरणी सोमवारी क्लीन चिट दिली आहे.

Commonwealth Games 2018: India gets clean chit by doping | Commonwealth Games 2018 : डोपिंगमधून भारताला मिळाली क्लीन चिट

Commonwealth Games 2018 : डोपिंगमधून भारताला मिळाली क्लीन चिट

googlenewsNext

गोल्डकोस्ट  - सिरिंंज प्रकरणात भारताला मोठा दिलासा लाभला. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने भारतीय मुष्टीयोध्यांना डोपिंगप्रकरणी सोमवारी क्लीन चिट दिली आहे. तथापि, स्पर्धेदरम्यान कुठल्याही प्रकारची सुई (इंजेक्शन) सोबत ठेवू नये, या नियमांतर्गत भारतीय खेळाडूंवर नजर राहणार आहे.
त्याआधी, भारताच्या राष्ट्रकुल क्रीडा पथकाला अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता होती. कारण मुष्टीयोद्धांकडे सिरिंंज मिळाली असल्याचा अंदाज आहे. निडल सापडणे म्हणजे स्पर्धेदरम्यान कुठल्याही प्रकारची सुई (निडल) जवळ बाळगण्याच्या नियमाचे उल्लंघन आहे. दरम्यान, भारताला डोपिंगसारख्या प्रकरणाला सामोरे जावे लागणार नसल्याचे मानले जात आहे. राष्टकुल क्रीडा महासंघाचे (सीजीएफ) सीईओ डेव्हिड ग्रेवमबर्ग यांनी पत्रकार परिषदेत सिरिंज मिळाली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सीजीएफने या प्रकरणाची चौकशी प्रारंभ केली आहे. पण या प्रकरणात कुठला देश सहभागी आहे, याचा खुलासा मात्र झालेला नाही. ग्रेवमबर्ग म्हणाले की, सीजीएफ संबंधित राष्ट्रकुल क्रीडा महासंघासोबत बातचीत करीत आहे.

चौकशीमध्ये पारदर्शकता
क्रीडा आयोजन समितीचे चेअरमन पीटर बीटी म्हणाले होते की, या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता राहील. चिकित्सा आयोगाच्या अहवालामध्ये संबंधित सीजीएची साक्ष राहील. त्यावर विचार करण्यासाठी आणि शिक्षा निश्चित करण्यासाठी आमच्या महासंघाच्या न्यायालयाकडे पाठविण्यात येईल.’
बीटी म्हणालेले,‘यात पूर्णपणे पारदर्शकता राहील आणि काहीच दडवून ठेवण्यात येणार नाही.’
सीजीएफची कुठल्याही प्रकारची निडल (सुई) न बाळगण्याची नीती कुठली वैद्यकीय मदत इंजेक्शनविना घेण्यापासून रोखते. या नीतीमध्ये ज्या खेळाडूंना डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषध किंवा पोषक तत्त्व घेणे आवश्यक आहे, त्यांना सूट देण्यात आली आहे. दरम्यान, सीजीएफने खेळाडूंनी त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

भारतीय अधिकाऱ्याने दिला दुजोरा
याप्रकरणीभारतीय पथकाने, आमची काही चूक नसल्याचे स्पष्ट केले. क्रीडाग्राममध्ये असलेल्या अन्य कुठल्या पथकाची सिरिंज असू शकते, असा दावाही त्यांनी केला आहे. एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, सिरिंज एका भारतीयाकडे मिळाली आहे, पण त्यांनी डोपिंगच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे वृत्त फेटाळले.
भारतीय पथकाचा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला,‘कुठल्याही प्रकारे डोपिंगचे उल्लंघन झालेले नाही, कारण सिरिंजचा उपयोग ‘मल्टी-व्हिटॅमिन’चे इंजेक्शन घेण्यासाठी झाला होता. हे डोपिंग नियमांचे उल्लंघन नाही. आमच्या मुष्टीयोध्यांची चाचणी घेण्यात आली आणि कुठलेही उल्लंघन झाले असते तर आम्हाला आतापर्यंत माहिती मिळाली असती.’

नि:शुल्क आईसक्रीम
राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये क्रीडाग्राममध्ये खेळाडूंसाठी जवळजवळ २,२५,००० कंडोम, १७,००० टॉयलेट रोल्स व नि:शुल्क आईसक्रीमची व्यवस्था करण्यात आली आहे.स्पर्धेदरम्यान ६ हजार खेळाडू व संघ अधिकाºयांसाटी क्रीडाग्राम सुविधाजनक व सुरक्षित राहील, अशी आयोजकांना आशा आहे. त्यात खेळाडू व सपोर्ट स्टाफच्या यौन स्वास्थाचाही समावेश आहे.

ट्रान्सजेंडर भारोत्तोलकाला मिळाले राष्ट्रकुल क्रीडाप्रमुखांचे समर्थन

राष्ट्रकुल खेळ आयोजकांनी न्यूझीलंडची ट्रान्सजेंडर भारोत्तोलक लारेल हुबार्डला आमच्याकडून पूर्ण समर्थन मिळणार असल्याचे आश्वासन दिले. हुबार्ड महिलांच्या ९० किलोपेक्षा अधिक वजन गटात सहभागी होणार आहे. आॅस्ट्रेलिया भारोत्तोलक प्रमुख माईक किलानने याचा विरोध केला होता. त्यांच्या मते, या खेळाडूला त्याचा लाभ मिळेल, पण राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे मुख्य कार्यकारी डेव्हिड ग्रेवमबर्ग म्हणाले, ‘नियमानुसार लारेल एक महिला म्हणून सहभागी होण्यास पात्र असल्याचे स्पष्ट असून स्पर्धेत सहभागी होण्याच्या तिच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो.’
न्यूझीलंडतर्फे मिळालेल्या माहितीनुसार ४० वर्षीय हुबार्ट उशिरा आॅस्ट्रेलियाला जाईल. ती प्रसारमाध्यमांसाठी आकर्षणाचा केंद्र बनली आहे. हुबार्टचे पूर्वीचे नाव गेविन होते. वयाची ३० वर्षे पूर्ण केल्यानंतर ती महिला झाली. यापूर्वी पुरुष म्हणून राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

क्रीडाग्राममध्ये तिरंगा फडकला
भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सिरिंज वाद बाजूला सारून सोमवारी क्रीडाग्राममध्ये राष्ट्रध्वज फडकावण्याच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. खेळाडू आनंदी होते आणि बॉक्सिंग पथकाने सोमवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. भारतीय बॉक्सर सिरिंज वादामध्ये केंद्रस्थानी आहेत.
पाचवेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळवणारी बॉक्सर एम.सी. मेरीकोम आनंदात असल्याचे दिसून आले तर भालाफेकपटू नीरज चोपडाने आपले छायचित्र काढून घेतले.

टीमसोबत असलेले एक बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणाले,‘आमचे लक्ष केवळ सरावावर आहे. अन्य कुठल्या बाबीचा आम्ही विचार करीत नाही.’
स्पर्धेपूर्वी भारतावर लाजिरवाणे होण्याची वेळ आली. काही भारतीय खेळाडूंच्या रुमबाहेर सिरिंज मिळाली. सिरिंज बॉक्सर्सच्या रुमबाहेर मिळाली असल्याची चर्चा आहे. राष्टकुल क्रीडा महासंघ याची चौकशी करीत आहे, पण सध्यातरी त्यांनी यात भारताच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. राष्ट्रध्वज फडकाविताना खेळाडूंमध्ये उत्साह दिसून आला.

Web Title: Commonwealth Games 2018: India gets clean chit by doping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.