Commonwealth Games 2018 : भारताला मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 05:17 PM2018-04-09T17:17:35+5:302018-04-09T17:17:35+5:30
सायना नेहनालच्या विजयाच्या जोरावर भारताने सुवर्णपदक पटकावले. भारताचे या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे एकूण दहावे सुवर्णपदक ठरले.
गोल्ड कोस्ट : सायना नेहवानले महिला एकेरीमध्ये विजय मिळवत भारतीय बॅडमिंटन संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली आणि तिच्या विजयाच्या जोरावर भारताने मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले. भारताचे या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे एकूण दहावे सुवर्णपदक ठरले.
मलेशियाचे आव्हान परतवत अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रानकीरेड्डी यांनी मिश्र दुहेरीमध्ये पेंग सुन चान आणि लियू यिंग गोह यांच्यावर 21-14, 21-14, 21-15 असा विजय मिळवला आणि भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आघाडी. त्यानंतर भारताच्या किदम्बी श्रीकांतने मलेशियाच्या चोंग वेई ली याच्यावर 21-17, 21-14 अशी मात केली.
पुरुषांच्या दुहेरीमध्ये सात्विक रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मलेशियाच्या शेम गोह आणि वी किऑग तॉन यांनी 21-15, 22-20 असे पराभूत केले. पण तरीही भारतीय संघ 2-1 अशा आघाडीवर होता. त्यानंतर सायनाने महिला एकेरीमध्ये सोनिया चेहवर 21-11, 19-21, 21-9 अशी मात करत भारतीय बॅडमिंटन संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.