Commonwealth Games 2018 : भारताचा सुवर्ण चौकार; वेटलिफ्टर वेंकट राहुल रगालाची अव्वल कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 04:49 PM2018-04-07T16:49:25+5:302018-04-07T16:49:25+5:30
भारताच्या वेंकट राहुल रगालाने पुरुषांच्या 85 किलो वजनीगटामध्ये अव्वल कामिगरी करताना सुवर्णपदक पटकावले. भारताने आतापर्यंत जी चार पदके पटकावली आहेत. ती वेटलिफ्टिंग या खेळातली आहेत.
गोल्ड कोस्ट : भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी वेटलिफ्टिंगमध्ये दुसऱ्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. या पदकासह भारताने भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांचा चौकार लगावला आहे. भारताच्या वेंकट राहुल रगालाने पुरुषांच्या 85 किलो वजनीगटामध्ये अव्वल कामिगरी करताना सुवर्णपदक पटकावले. भारताने आतापर्यंत जी चार पदके पटकावली आहेत. ती वेटलिफ्टिंग या खेळातली आहेत.
शनिवारी सकाळी पुरूषांच्या 77 किलो वजनी गटात सतीश शिवलिंगमनेही सुवर्ण कामगिरी केली आहे. 317 किलो वजन उचलत सतीशने सुवर्णपदक आपल्या नावे केलं.
दरम्यान, याआधी दुसऱ्या दिवशी झालेल्या खेळात वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दोन पदकं मिळाली. संजिता चानूने सुवर्ण पटकावलं. तर पुरूष गटात वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या दीपक लाथरने सुवर्णपदकाची कमाई केली. आत्तापर्यंत वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला पाच पदकं मिळाली आहेत. गुरूवारी गोल्ड कोस्ट खेळाच्या पहिल्या दिवशी मीराबाई चानूने महिला 48 किलो वजनीगटात भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. तर गुरूराजने पुरूष 56 किलो वजनीगटात रौप्यपदक जिंकलं.