Commonwealth Games 2018: जीतू रायचा 'सुवर्ण'वेध; ओम मिथरवालला कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 08:25 AM2018-04-09T08:25:57+5:302018-04-09T08:46:37+5:30

भारताची स्पर्धेतील एकूण पदकसंख्या १५ वर

Commonwealth Games 2018 Jitu Rai wins Gold Om Mitharwal wins Bronze | Commonwealth Games 2018: जीतू रायचा 'सुवर्ण'वेध; ओम मिथरवालला कांस्यपदक

Commonwealth Games 2018: जीतू रायचा 'सुवर्ण'वेध; ओम मिथरवालला कांस्यपदक

Next

वेटलिफ्टर्सच्या पाठोपाठ नेमबाजांनीही राष्ट्रकुल स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरी सुरु ठेवली आहे. काल मनू भाकरने सुवर्णपदकाची कमाई केल्यावर आज जीतू रायने सोनेरी कामगिरी केली. १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात जीतू रायने सुवर्णपदक पटकावले आहे. तर ओम मिथरवालने कांस्यपदक जिंकले आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताला दोन पदकांची आशा होती. भारतीय नेमबाजांनी अपेक्षित कामगिरी करत दोन पदकांची कमाई करुन भारताची स्पर्धेतील एकूण पदकांची संख्या १५ वर नेली आहे. 

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या जीतू रायने २३५.१ गुणांची कमाई करत सुवर्णपदकाची कमाई केली. पात्रता फेरीत ५८४ गुण पटकावून लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या ओम प्रकाश मिथरवालला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने २१४.३ गुण मिळवले. दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या केरी बेलने जीतू रायला कडवी झुंज दिली. त्याने एकूण २३३.५ गुणांची कमाई केली. मात्र जीतूने त्याचा सर्व अनुभव पणाला लावत केरी बेलला मागे टाकले आणि भारताला स्पर्धेतील आठवे सुवर्णपदक मिळवून दिले.

२०१४ मध्ये ग्लास्गोत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर एअर पिस्तुल प्रकारात जीतू रायने सुवर्णपदकाची कमाई केली होती. मात्र त्याला १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात स्थान मिळाले नव्हते. यंदा प्रथमच जीतू राय राष्ट्रकुल स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत होता. याशिवाय जीतू रायने रिओ ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिथे त्याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 

Web Title: Commonwealth Games 2018 Jitu Rai wins Gold Om Mitharwal wins Bronze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.