Commonwealth Games 2018: मणिपूर ते राष्ट्रकुल... मीराबाईचा थक्क करणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 05:08 PM2018-04-05T17:08:24+5:302018-04-05T17:08:24+5:30

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाईने भारताला सुवर्णपदकाची बोहनी करून दिली. एखादे पदक मिळाल्यावर या खेळाडूंना वलय निर्मण होतं, ते प्रकाशझोतात येतात. पण या पदकामागची त्यांची मेहनत मात्र तोपर्यंत कुणाला दिसत नाही. मीराबाईचा आतापर्यंतचा हा थक्का करणारा प्रवास.

Commonwealth Games 2018: Manipur to Commonwealth ...Thrilling journey of Mirabai Chanu | Commonwealth Games 2018: मणिपूर ते राष्ट्रकुल... मीराबाईचा थक्क करणारा प्रवास

Commonwealth Games 2018: मणिपूर ते राष्ट्रकुल... मीराबाईचा थक्क करणारा प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देरिओमधून भारतात आल्यावर मीराबाई निराशेच्या गर्तेत सापडली. मीराबाईची कारकिर्द संपली, असंही काही जण म्हणायला लागले होते. कारण मीराबाई ही मानसीक रुग्ण बनली होती.

मुंबई : 'गोल्ड' कोस्ट या नावाला जागली ती भारताची मीराबाई चानू. कारण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाईने भारताला सुवर्णपदकाची बोहनी करून दिली. एखादे पदक मिळाल्यावर या खेळाडूंना वलय निर्मण होतं, ते प्रकाशझोतात येतात. पण या पदकामागची त्यांची मेहनत मात्र तोपर्यंत कुणाला दिसत नाही.

मीराबाई चानू, मणिपूरची. इम्फालपासून जवळपास 200 किलोमीटर लांब तिचं गाव होतं. कुंजुराणी ही त्यावेळी वेटलिफ्टिंगमध्ये भन्नाट फॉर्मात होती. मीराबाईने कुजुंराणीला प्रेरणास्थानी ठेवलं. त्यावेळी याच खेळात कारकिर्द घडवायचं तिने ठरवलं. गावात कोणतीही खेळाची साधनं नव्हती. घरची परिस्थितीही बेताचीच. पण काही करून वेटलिफ्टिंगमध्ये कारकिर्द घडवायची, हे तिने मनाशी पक्क केलं होतं. वयाच्या 13व्या वर्षी मीराबाई घरापासून जवळपास 60 किलोमीटर लांब असलेल्या खुमान क्रीडा संकुलात सराव करायला लागली.

कनिष्ठ गटात मीराबाईची कामगिरी चांगली होत होती. 2011 साली तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन पदके पटकावली आणि आपली दखल घ्यायला तिने भाग पाडले. 2013 साली ती वेटलिफ्टिंगमध्ये देशातील सर्वोत्तम खेळाडू होती. 2014 साली झालेल्या ग्लासगो येथील राट्रकुल खेळीत तिने रौप्यपदक पटकावले होते. त्यावेळी 2016 साली होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाई देशाला पदक जिंकवून देणार, अशी शाश्वती काही जाणकारांना वाटत होती.

ऑलिम्पिकची जोरदार तयारी तिने सुरु केली. राष्ट्रीय स्पर्धा गाजवली. त्यानंतर आपली आदर्श असलेल्या कुंजुराणी, हिचेही विक्रम तिने मोडीत काढले. स्पर्धांची तयारी करताना तिने साऱ्या वैयक्तिक गोष्टीही बाजूला ठेवल्या. आपल्या सख्या बहिणीच्या लग्नालाही तिने जाणे टाळले होते. अथक मेहनत घेत ती रिओमध्ये दाखल झाली, पण पदकांपासून वंचित राहीली. जी कामिगरी ती सहजपणे करू शकत होती, तीदेखील तिच्याकडून झाली नव्हती. या गोष्टीचा तिच्यावर विपरीत परिणाम झाला.

रिओमधून भारतात आल्यावर मीराबाई निराशेच्या गर्तेत सापडली. लोकांच्या विश्वासाला आपण तडा दिला, देशाने आपल्यावर एवढे पैसे खर्च केले, पण आपण रीत्याहाती परत आलो, असा विचार मीराबाईने करायला सुरुवात केली. या विचारांतून ती बाहेर येत नव्हती. सराव पूर्णपणे बंद झाला होता. मीराबाईची कारकिर्द संपली, असंही काही जण म्हणायला लागले होते. कारण मीराबाई ही मानसीक रुग्ण बनली होती. त्यावेळी तिच्यावर मानसोपचार करण्यात आले आणि तिला पुन्हा खेळाकडे वळवण्यात तिच्या कुटुंबियांना आणि प्रशिक्षकांना यश मिळाले. मीराबाई पुन्हा खेळाकडे वळली आणि 2017 साली झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताने तब्बल 22 वर्षांनी या या मानाच्या स्पर्धेत पदक पटकावले होते. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरीने 1994 आणि 1995 साली विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.

अमेरिकेत झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील पदकानंतर पुन्हा एकदा मीराबाईच्या कारकिर्दीला वगळे वळण मिळाले. आता तिने डोळ्यापुढे राष्ट्रकुल स्पर्धा ठेवली होती. राष्ट्रकुलसाठी गोल्ड कोस्टमध्ये दाखल झाल्यावरही मीराबाई सुवर्णपदक जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटले नव्हते. पण गुणवत्ता, अथक मेहनत, चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर मीराबाईने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

Web Title: Commonwealth Games 2018: Manipur to Commonwealth ...Thrilling journey of Mirabai Chanu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.