Commonwealth Games 2018: संजिता चानूने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 07:38 AM2018-04-06T07:38:20+5:302018-04-06T07:43:55+5:30
भारताच्या संजिता चानूने भारतात दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.
नवी दिल्ली- कॉमनवेल्थ गेम्सच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवातही दमदार झाली आहे. भारताच्या संजिता चानूने भारतात दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. वेटलिफ्टिंग प्रकारात संजिताने सुवर्ण पदाकाची कमाई केली आहे. 192 किलो वजन उचलत संजिताने पदक आपल्या नावे केलं. 53 किलो वजनी गटात 192 किलो वजन उचलत संजिताने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. गत कॉमनवेल्थमध्ये मध्येही संजिता चानूने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं होतं. तसंच स्नॅच प्रकारात 84 किलो वजन उचलून संजिताने कॉमनवेल्थ गेम्समध्ये नवा विक्रम केला आहे. वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला मिळालेलं हे दुसरं सुवर्णपदक आहे.
गुरूवारी (मार्च 5) मीराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. ४८ वजनी गटात मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावलं. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक ठरलं. चानूने पहिल्या प्रयत्नात ८० किलो वजन उचलले. यानंतर तिने ८४ आणि ८६ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले.
मीराबाई चानूकडून भारताला पदकाची आशा होती. मीराबाईनेही तिच्या चाहत्यांना निराश केलं नाही. मीराबाईने फक्त सुवर्णपदकाचीच कमाई केली नाही, तर तिने हे सुवर्णपदक विक्रमी कामगिरी नोंदवून पटकावलं.