...अन् सिक्युरिटी गार्डच्या मुलाने भारताला मिळवून दिलं तिसरं सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 09:54 AM2018-04-07T09:54:47+5:302018-04-07T09:54:47+5:30
नवी दिल्ली- भारताचा स्टार वेटलिफ्टर सतीश कुमार शिवलिंगमने 21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिसऱ्या दिवशी भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलं. सतीशने पुरूषांच्या 77 किलो वजनीगटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. सतीशला वेटलिफ्टिंगचं शिक्षण त्याच्या वडिलांकडून मिळालं आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सतीश शिवलिंगमचे वडील वेटलिफ्टर होते. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविलं आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतं सतीशने वेटलिफ्टिंगमध्ये करिअर घडविण्याचं ठरविलं. वेटलिफ्टिंगची निवड केल्यावर सतीशला त्याच्या वडिलांनी सुरूवातील वेटलिफ्टिंगचं शिक्षण दिलं. सतीशचे वडील एका विद्यापीठात सिक्युरिटी गार्डची नोकरी करत आहेत. तर सतीश चेन्नईमध्ये रेल्वेत क्लर्कची नोकरी करतो.
सतीश शिवलिंगमचा हा तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये जन्म झाला. सतीशने दोन कॉमनवेल्थ खेळात सुवर्णपदक जिंकून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तसंच त्याने एशियन गेम्समध्येही शानदार प्रदर्शन केलं आहे.