Commonwealth Games 2018 : ट्रक चालकाच्या मुलाने जिंकले पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:00 AM2018-04-06T02:00:48+5:302018-04-06T02:00:48+5:30

२५ वर्षीय गुरुराजा हा भारतीय हवाई दलाचा कर्मचारी असून कर्नाटकचा रहिवासी आहे. त्याचे वडील ट्रकचालक असून अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी गुरुराजाला मोठे केले.

Commonwealth Games 2018: truck driver's son Win Medal | Commonwealth Games 2018 : ट्रक चालकाच्या मुलाने जिंकले पदक

Commonwealth Games 2018 : ट्रक चालकाच्या मुलाने जिंकले पदक

googlenewsNext

२५ वर्षीय गुरुराजा हा भारतीय हवाई दलाचा कर्मचारी असून कर्नाटकचा रहिवासी आहे. त्याचे वडील ट्रकचालक असून अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी गुरुराजाला मोठे केले. रौप्य जिंकल्यानंतर गुरुराजाने वैद्यकीय पथक सोबत नसल्याचा पुनरुच्चार केला. फिजिओथेरपिस्ट नसल्यामुळे मला योग्य प्रकारे उपचार घेता आला नाही, असे त्याने म्हटले. क्रीडा मंत्रालयाच्या नियमांमुळे भारतीय पथकाला पुरेसे वैद्यकीय पथक आणि अन्य सहकारी आॅस्ट्रेलियाला नेता आले नाहीत. तीन पैकी पहिल्या दोन प्रयत्नात गुरुराजाला अपयश आले.
स्पर्धेतून जवळपास बाहेर फेकल्या गेलेल्या गुरुराजाला प्रशिक्षकांनी मोलाची सूचना केली. ‘तुझ्या एका प्रयत्नावर संपूर्ण कारकिर्द कशी असेल हे ठरणार आहे.’ यानंतर त्याच्या मनात देशाचा व कुटुंबाचा विचार आला. रौप्य जिंकल्यानंतर गुरुराजाने म्हटले की, ‘देशवासीयांना निराश करायचे नाही, या निर्धारासह व्यासपीठावर आलो आणि १३८ किलो वजन उचलून पदकावर नाव कोरले.’ तसेच, ‘२०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुशील कुमारला कुस्ती खेळताना पाहिले. मलाही कुस्ती खेळायची होती. मात्र प्रशिक्षक राजेंद्र यांनी मला वेटलिफ्टींगकडे वळवले,’ असेही गुरुराजाने म्हटले.

गुरुराजाला रौप्य पदक !
मीराबाई चानूच्या
सुवर्ण यशाचा जल्लोष होण्याआधी २५ वर्षांचा पी. गुरुराजा याने पुरुषांच्या ५६ किलो वजन गटात पदार्पणात २४९ किलो वजन (१११ आणि १३८) उचलून रौप्यपदकाची कमाई केली. गुरुराजा स्नॅचमध्ये १११ किलो वजन उचलल्यानंतर तिसऱ्या स्थानावर होता. क्लीन अ‍ॅण्ड जर्क प्रकारातील पहिल्या दोन प्रयत्नांत तो अपयशी ठरला, पण तिसºया प्रयत्नांत १३८ किलो वजन उचलून पदक निश्चित केले.

मनासारखी कामगिरी झाली नाही
‘राष्टÑकुल स्पर्धेतील हे माझे पहिलेच पदक असून अपेक्षित कामगिरी झाली नाही. माझी उत्कृष्ट कामगिरी १५५-५६ किलोंची आहे. मी १५५-५६ किलोंपेक्षा जास्त वजन उचलू शकेन, असे वाटत होते; पण शरीराने साथ दिली नाही. माझ्यावर कोणतेही मानसिक दडपण नव्हते. येथील वातावरणही पोषक आहे. आंतरराष्टÑीय स्पर्धेतील हे माझे चौथे पदक आहे,’ असे गुरुराजाने ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Commonwealth Games 2018: truck driver's son Win Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.