Commonwealth Games 2022 : कसला भारी पळाला! महाराष्ट्राच्या अविनाश साबळेच्या 'ऐतिहासिक' शर्यतीचे व्हा साक्षीदार, Video  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 08:51 PM2022-08-06T20:51:02+5:302022-08-06T20:51:22+5:30

Commonwealth Games 2022 Avinash Sable : वेटलिफ्टर संकेत सरगर याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकाचा श्रीगणेशा केला.

Commonwealth Games 2022 Avinash Sable : Avinash Sable's rise & rise is superb. today he is a CWG silver medallist & nearly made a late push for gold. So close, Watch Video  | Commonwealth Games 2022 : कसला भारी पळाला! महाराष्ट्राच्या अविनाश साबळेच्या 'ऐतिहासिक' शर्यतीचे व्हा साक्षीदार, Video  

Commonwealth Games 2022 : कसला भारी पळाला! महाराष्ट्राच्या अविनाश साबळेच्या 'ऐतिहासिक' शर्यतीचे व्हा साक्षीदार, Video  

Next

Commonwealth Games 2022 Avinash Sable : वेटलिफ्टर संकेत सरगर याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकाचा श्रीगणेशा केला. महाराष्ट्राच्या या खेळाडूने रौप्यपदक जिंकले आणि त्यानंतर भारताचा पदकांचा पाऊस सुरू झाला. शनिवारी महाराष्ट्राच्या आणखी एका सुपूत्राने केनियाच्या खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढताना ऐतिहासिक पदकाची कमाई केली. बीडच्या अविनशा साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला ३००० मीटर स्टीपलचेस मध्ये रौप्यपदक जिंकून दिले. या क्रीडा प्रकारातील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मागील सहा पर्वांत केनियाच्या खेळाडूंनी तीनही पदकांवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले होते, परंतु आज अविनाशने त्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला. 

अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेस  ( Avinash Sable broke the 3000m Steeplechase National Record ) शर्यतीच्या अंतिम फेरीत केनियन खेळाडूंना कडवी टक्कर दिली. अविनाशने ८:११.२० सेकंदाच्या राष्ट्रीय विक्रमी वेळेसह रौप्यपदक जिंकले. केनियाचे तीन खेळाडू आघाडीवर असतानाही अविनाश त्यांना तोडीसतोड उत्तर देत होता. चौथ्या क्रमांकावर असलेल्या अविनाशने अखेरच्या राऊंडपर्यंत हे स्थान कायम राखले होते. अखेरच्या लॅपमध्ये अविनाशने मुसंडी मारली आणि रौप्यपदकाच्या शर्यतीत झेप घेतली. त्याची ही धाव पाहून स्टेडियमवर भारताचा जयघोष होऊ लागला. केनियाच्या खेळाडूंचीही धाकधुक वाढली होती आणि अविनाशने टफ फाईट दिली. ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली

 

Web Title: Commonwealth Games 2022 Avinash Sable : Avinash Sable's rise & rise is superb. today he is a CWG silver medallist & nearly made a late push for gold. So close, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.