Commonwealth Games 2022 : लवलीना बोरगोहाईंचा धक्कादायक पराभव, भारताच्या सहा बॉक्सर्सनी पक्की केली पदकं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 10:24 PM2022-08-04T22:24:48+5:302022-08-04T22:25:45+5:30

Commonwealth Games 2022 Boxing : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय बॉक्सिंगपटूंनी तीन पदकं निश्चित केली आहे.

Commonwealth Games 2022 Boxing : Shocking defeat of Lovlina Borgohain; SAGAR AHLAWAT CONFIRMS 6TH BOXING MEDAL for india, know day 6 updates | Commonwealth Games 2022 : लवलीना बोरगोहाईंचा धक्कादायक पराभव, भारताच्या सहा बॉक्सर्सनी पक्की केली पदकं

Commonwealth Games 2022 : लवलीना बोरगोहाईंचा धक्कादायक पराभव, भारताच्या सहा बॉक्सर्सनी पक्की केली पदकं

Next

Commonwealth Games 2022 Boxing : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय बॉक्सिंगपटूंनी तीन पदकं निश्चित केली आहे. सागर ( ९२+ किलो), जास्मिन ( ५७-६० किलो) व अमित पांघल ( ४८-५१ किलो) यांनी आपापल्या गटाची उपांत्य फेरी निश्चित करून किमान कांस्यपदक पक्के केले आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या लवलीना बोरगोहाईंचा पराभव हा धक्कादायक निकाल ठरला. आतापर्यंत भारताच्या सहा बॉक्सर्सनी पदक निश्चित केले आहे. काल नीतू, हुसैन मुहम्मद व निखत जहीरनने पदक पक्के केले होते.

#Boxing आशियाई पदक विजेत्या अमित पांघलने ४८-५१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनचा ५-० असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीत प्रवेश करून त्याने भारतासाठी यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील बॉक्सिंगमधील चौथे पदक पक्के केले. 


#Boxing जास्मिननेही ५७-६० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टनवर मात करून भारताचे आणखी एक पदक पक्के केले. ९२+ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत सागर अहलावतने सेयचेलेसच्या केडी एग्नेसवर ५-० असा विजय मिळवताना भारताचे आणखी एक पदक निश्चित केले.  


#Para Powerlifting : पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या लाईटवेट गटाच्या अंतिम फेरीत मनप्रीत कौरने तिच्या तीन प्रयत्नांपैकी दोनमध्ये ८७ व ८८ किलो भार उचलला. २०१८च्या आशियाई पॅरा स्पर्धेत ५० किलो वजनी गटात रौप्य आणि २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सकीनाचा ९० किलो उचलण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. पण, दुसऱ्या प्रयत्नात तिने ९० किलो भार उचलला, परंतु भारतीय खेळाडू पदक शर्यतीतून बाहेर राहिले.

#Badminton भारताच्या पी व्ही सिंधूने महिला एकेरीच्या राऊंड ऑफ ३२ मध्ये मालदिवच्या फातिमा नबाह अब्दुल रझ्झाकवर २१-४, २१ -११ असा विजय मिळवला. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा/बी सुमिथ रेड्डी यांनी २१-१८, २१-१६ अशा फरकाने इंग्लंडच्या हेमिंग कॅलम/ पघ जेसिका यांचा पराभव केला. पुरुष एकेरीत श्रीकांत किदम्बीने २१-९, २१-९ असा सहज युगांडाच्या डॅनिएल वनगॅलियावर मात केली. 

#Athletics महिलांच्या हातोडाफेक स्पर्धेत मंजू बालाने ५९.६८ मीटर हातोडा फेकून अंतिम फेरीत प्रवेश पक्का केला. ५७.४८ मीटर लांब हातोडा फेकणारी सरिता सिंग १३ वी आली आणि तिला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. हिमा दासने महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत उपांत्यफेरी गाठली आहे. तिने २३.४२ सेंकदात हे अंतर गाठले. हिमा हिट-२ मध्ये अव्वल राहिली असून तिचा उपांत्यफेरीचा सामना अनुक्रमे ५ आणि ६ ऑगस्ट रोजी होईल. 


#Squash महिला दुहेरीच्या लढतीत सारा कुरविल्ला व अनाहत सिंग या युवा खेळाडूंनी ११-९, ११-४ अशा फरकाने श्रीलंकेच्या येहेनी कुरूप्पू व चनिथ्मा सिनाली या जोडीवर विजय मिळवून आगेकूच केली. मिश्र दुहेरीत जोश्ना चिनप्पा व हरिंदर पाल सिंग संधू या अनुभवी जोडीला ऑस्ट्रेलियाच्या लॉबन डोना व कॅमेरून पिली यांच्याकडून ८-११,९-११ असा पराभव पत्करावा लागला.
#Squash  सौरव घोषाल व दीपिका पल्लिकल या जोडीने विजयी सुरूवात करताना वेल्सच्या एमिली व्हाईटलॉक व पीटर क्रीड जोडीचा ११-८, ११- ४ असा पराभव केला. 
#TableTennis मनिका बात्रा/साथियन ज्ञानसेकरन या जोडीने ११-१, ११-३, ११-१ अशा फरकाने सेयचेलेसच्या मिक क्री व लॉरा सिनोनचा पराभव करून मिश्र दुहेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

 

 

Web Title: Commonwealth Games 2022 Boxing : Shocking defeat of Lovlina Borgohain; SAGAR AHLAWAT CONFIRMS 6TH BOXING MEDAL for india, know day 6 updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.