Commonwealth Games 2022 : पेपरमधले आर्टिकल वाचून बॉक्सर बनण्याचं ठरवलं अन् शेतकऱ्याच्या पोरानं राष्ट्रकुलमध्ये पदक जिंकलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 01:41 AM2022-08-08T01:41:03+5:302022-08-08T01:41:42+5:30
Commonwealth Games 2022 Boxing : निखत जरीन, नितू आणि अमित पांघल यांनी बॉक्सिंगमधील सुवर्णपदकाचे खाते उघडले.
Commonwealth Games 2022 Boxing : निखत जरीन, नितू आणि अमित पांघल यांनी बॉक्सिंगमधील सुवर्णपदकाचे खाते उघडले. मध्यरात्री ९२ किलो वजनी गटात सागर अहलावतने रौप्यपदकाची कमाई केली. त्याने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डेलिशियस ओरीएला कडवी टक्कर दिली, परंतु पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणाऱ्या भारतीय मुक्केबाजाचा अनुभव कमी पडला.
२० वर्षीय सागर प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे ही त्याची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सागरच्या घरच्यांचा खेळाशी दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही. अभ्यासात रस नसल्याने सागरने बॉक्सिंगचा पर्यायी मार्ग शोधला अन् त्यात आता तो रमला. फ्लॉयड मेवेदर व मॅनी पॅक्यू यांच्याबद्दत ७ वर्षांपूर्वी एका न्यूजपेपरमध्ये छापून आलेल्या आर्टिकलने सागरच्या आयुष्याला कलाटणी दिली. त्या आर्टिकलमधून प्रेरणा घेत सागरने बॉक्सिंग करण्याचा निर्णय घेतला.
SAGAR BACK FROM A WAR 🔥
— SAI Media (@Media_SAI) August 7, 2022
🇮🇳's Sagar Ahlawat 🥊tried his best to give a superlative performance against 🏴's D. Orie, settling for SILVER 🥈in Men's +92kg Final at #CommonwealthGames2022
Face busted open, hard 👊 consumed, still standing up tall
Take a bow 🙇♀️🙇♂️#Cheer4Indiapic.twitter.com/rhuOsxyMSQ
२०१७मध्ये त्याने झझ्झर येथील जवाहर बाग स्टेडियमवर सरावाला सुरूवात केली. तो रोज २० किमी बाईकने प्रवास करायचा, पण वडीलांना शेतात मदत करावी लागत असल्याने सरावात सातत्य राखता येत नव्हते. तरीही त्याने बॉक्सिंगचा ध्यास सोडला नाही. २०१९मध्ये त्याने ऑल इंडिया युनिव्हर्सिटीत सुवर्ण जिंकले. त्यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटीत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या ट्रायलमध्ये त्याने त्याचा आदर्श सतिश कुमार याला पराभूत केले आणि त्यानंतर राष्ट्रीय विजेत्या नरेंदरवरही मात केली.
#Boxing विश्वविजेत्या निखतसमोर नॉर्दन आयर्लंडच्या कार्ली मॅक नॉलचे आव्हान होते. बचाव व आक्रमण याचा सुरेख संगम राखताना निखतने आयर्लंडच्या बॉक्सरचला चकवले होते. पहिल्या राऊंडमध्ये निखतने वर्चस्व गाजवले होते. सर्व ५ पंचांकडून तिने १०पैकी १० गुण घेतले होते. दुसऱ्या राऊंडमध्ये मॅक नॉलने जोरदार पंच मारून सामन्यातील चुरस वाढवली. निखत आपली ऊर्जा वाचवून खेळ करताना दिसली, ती तिसऱ्या राऊंडसाठी सर्व ताकद वाचवून होती. निखतने तिच्यापेक्षा ७ वर्ष वयाने मोठ्या असलेल्या खेळाडूला थकवून बाजी मारली.
𝙉𝙄𝙆𝙃𝘼𝙏 𝙂𝙍𝘼𝘽𝙎 🥇
Reigning world champion @nikhat_zareen continues her golden run as she seals the 50kg Final bout in an unanimous decision and make her statement in style. 😍💥
Kudos girl! 👏@AjaySingh_SG | @debojo_m#CommonwealthGames2022#PunchMeinHainDum 2.0 pic.twitter.com/LSsku6gLhN— Boxing Federation (@BFI_official) August 7, 2022
#Boxing अमित पांघलने ( Amit Panghal) टोक्योतील निराशाजनक कामगिरी मागे टाकून आज कमाल केली. ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अमितने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना इंग्लंडच्या किएरन मॅकडोनाल्डला हतबल केले. पहिला राऊंड अमितने सहज जिंकला, परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये मॅकडोनाल्डने संघर्ष दाखवला. तिसऱ्या राऊंडमध्ये सुरुवातीला डिफेन्सिव्ह खेळ केल्यानंतर अमितने अचानक अखेरच्या ४० सेकंदात जोरदार ठोसे मारले. अमितने ५-० असा विजय मिळवून सुवर्णपदक पक्के केले.
2️⃣nd GOLD🥇FOR 🇮🇳@Boxerpanghal better his 2018 CWG medal after showing his lethal game against 🏴’s K. Macdonald to claim the 🥇!
— Boxing Federation (@BFI_official) August 7, 2022
Score: 5-0
Congratulations, champ! 👏👏@AjaySingh_SG | @debojo_m@birminghamcg22#Commonwealthgames#B2022#PunchMeinHainDum 2.0#birmingham22pic.twitter.com/ylXHKdiFKP
#Boxing बॉक्सिंगमध्ये आजच्या दिवसाचे पहिले सुवर्णपदक आले. भारताच्या नितूने ४८ किलो वजनी गटात इंग्लंडच्या डेमी जेड रेसझ्तानवर ५-० असा विजय मिळवून गोल्ड मेडल जिंकले.