Commonwealth Games 2022 : तेजस्वीन शंकरने उंच उडीत जिंकले भारतासाठी पहिले पदक, क्रिकेटपटू मिचेल स्टार्कच्या भावाकडून झाला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 01:35 AM2022-08-04T01:35:00+5:302022-08-04T01:37:14+5:30
स्क्वॉशमध्ये एकेरीत पदक जिंकणारा सौरव हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. मध्यरात्री तेजस्वीन शंकरने ( Tejaswin Shankar) उंच उडीत कांस्यपदकाची कमाई केली.
Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत बुधवारी भारताच्या खात्यात तीन पदकांची भर पडली. वेटलिफ्टर लवप्रीत सिंग ( Lovepreet Singh) १०९ किलो वजनी गटात कांस्यपदक, स्क्वॉशपटू सौरव घोषालने पुरूष एकेरीत कांस्य आणि ज्युदोपटी तुलिका मानने विक्रमी रौप्यपदक जिंकले. स्क्वॉशमध्ये एकेरीत पदक जिंकणारा सौरव हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. मध्यरात्री तेजस्वीन शंकरने ( Tejaswin Shankar) उंच उडीत कांस्यपदकाची कमाई केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेजस्वीनचा अगदी अखेरच्या क्षणाला भारताच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या ताफ्यात समावेश करण्यात आला होता. उंच उडीतील भारताचे हे पहिलेवहिले पदक ठरले
Bronze for Tejaswin Shankar , 18th medal for India
— Sports India (@SportsIndia3) August 3, 2022
Tejaswin Shankar won first track & Field medal for India as he finish 3rd in men High jump with best effort of 2.22
He was not there in first list selected by @afiindia but got selected in last moment & now won 🥉 for India pic.twitter.com/FEJ8Vaw4zK
त्याशिवाय बॉक्सिंगमध्ये नितू पांघास, निखत झरीन व मोहम्मद हुस्सामुद्दीन यांनी आपापल्या गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून भारतासाठी तीन पदकं पक्की केली. भारताच्या महिला हॉकी संघाने कॅनडावर ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष हॉकी संघाने ८-० अशा फरकाने कॅनडाचा धुव्वा उडवताना उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.
पुरुषांच्या उंच उडीत तेजस्वीन शंकरने २.१०, २.१५ व २.१९ असे यशस्वी प्रयत्न केले. तेजस्वीन २.२२ मीटर उंच उडीसह पदक शर्यतीत स्वतःला आघाडीवर राखले होते. पण, न्यूझीलंडच्या हामिश केर व ऑस्ट्रेलियाच्या ब्रेंडन स्टार्क यांनी २.२५ मीटर उंच उडी मारून आघाडी घेतली. तेजस्वीनला २.२५ मीटरचे अंतर पार करता आले नाही. दोन प्रयत्न फसल्यानंतर तेजस्वीनच्या पदकाच्या आशा डोनाल्ड थॉमसवर होत्या आणि नशीबाची साथ मिळाली. बहरिनच्या या खेळाडूला तीनही प्रयत्नात २.२५ मीटर पार करता न आल्याने तेजस्वीनचे कांस्यपदक पक्के झाले.
Tejaswin Shankar gets guaranteed bronze medal in the mens high jump of CWG 2022 at Birmingham clearing height of 2.22m. Now he attempt to clear 2.28m to fight for Gold. @afiindia#Indianathleticspic.twitter.com/nv82p7pdKa
— Rahul PAWAR (@rahuldpawar) August 3, 2022
न्यूझीलंडच्या हामिश केरने सुवर्ण, तर ऑस्ट्रेलियाच्या ब्रेंडन स्टार्कने रौप्यपदक जिंकले. ब्रेंडन स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मिचेल स्टार्क याचा भाऊ आणि महिला क्रिकेटपटू एलिसा हिली हिची दीर आहे. २०१८मध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
कोण आहे तेजस्वीन शंकर?
दिल्लीतील तमिळ कुटुंबातील तेजस्वीनचा जन्म.. ८व्या इयत्तेपर्यंत तो क्रिकेट खेळायचा, परंतु शारीरिक शिक्षणाच्या सरांनी त्याला उंच उडी शिकण्याचा सल्ला दिला आणि त्याने आंतरशालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत पदकही जिंकले. त्याचे वडील हरीशंकर हे वकील होते, परंतु २०१४ मध्ये रक्ताच्या कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. २०१५च्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेत त्याने २.१४ मीटर उंच उडीसह सुवर्णपदक जिंकले. २०१६ मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेत २.१७ मीटरसह रौप्यपदकाची कमाई केली. दुखापतीमुळे त्याला आशियाई कनिष्ट अजिंक्यपद स्पर्धेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि जागतिक स्पर्धेला मुकावे लागले होते. १७व्या वर्षी त्याने हरी शंकर रॉय यांचा १२ वर्ष जुना २.२५ मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडताना कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत २.२६ मीटरची नोंद केली. २०१८मध्ये त्याने इंडोअर राष्ट्रीय विक्रम मोडला आणि २.१८ मीटरची नोंद केली.