Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये हाणामारी; हॉकी स्टिक लागल्याने वाद, एकाने पकडला दुसऱ्याचा गळा: Video व्हायरल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 12:27 PM2022-08-05T12:27:25+5:302022-08-05T12:28:53+5:30
England vs Canada hockey Match: इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी खेळाडूंमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. यावेळी खेळाडूंनी एकमेकांचे टी-शर्टही खेचले.
England vs Canada hockey Match:इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी (4 ऑगस्ट) हॉकी सामन्यात खेळाडूंमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. प्रकरण एवढे वाढले की, एका खेळाडूने दुसऱ्याचा गळा पकडला. यावेळी त्या दोघांनी एकमेकांचे टी-शर्टही खेचले. अखेर इतर खेळाडून आणि रेफरीच्या मध्यस्थीने वाद मिटला.
सामना यजमान इंग्लंड आणि कॅनडा यांच्यात सुरू होता. इंग्लंडने हा सामना 11-2 अशा फरकाने जिंकला. सध्या यजमान इंग्लंड गटात दुसऱ्या क्रमांकावर आणि भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. आता उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल तर भारताचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंडसोबत होईल.
😱
— Hockey World News (@hockeyWrldNws) August 4, 2022
Wrong hockey sport Panesar!
Completely let down @FieldHockeyCan with that one. #cwg2022 | #Birmingham22 | #hockeypic.twitter.com/7OyYv6ZUDr
सामन्यात नेमकं काय झालं?
हाफ टाईमचा बिगुल वाजण्याच्या काही मिनिटे आधी हा वाद झाला. इंग्लंडने 4-1 अशी आघाडी घेतली होती आणि कॅनडाचा संघ गोलसाठी सातत्याने आक्रमक वृत्ती स्वीकारत होता. दरम्यान, चेंडू हिसकावण्यासाठी कॅनडाचा बलराज पानेसर आणि इंग्लंडचा ख्रिस ग्रिफिथ यांच्यात चुरशीची लढत झाली.
रेड-यलो कार्ड देण्यात आले
यादरम्यान खेळताना बलराजची हॉकी स्टिक ग्रिफिथच्या हातावर अडकली. यामुळे संतापलेल्या इंग्लिश खेळाडूने पानेसरला धक्काबुक्की केली. मग दोन्ही खेळाडू भडकले आणि पानेसरने ग्रिफिथचा गळा पकडला. यानंतर हॉकीचा सामना रणांगणात बदलला. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे टी-शर्टही पकडून ओढले. यावेळी दोन्ही संघांचे खेळाडू आणि रेफरी आले. प्रकरण वाढण्याआधी किंवा मारामारी होण्यापूर्वीच त्यांनी हस्तक्षेप केला आणि वाद मिटवला. यावेळी रेफरीने पानेसरला लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले तर ग्रिफिथला पिवळे कार्ड दाखवून इशारा देण्यात आला.