Commonwealth Games 2022 Medal tally : २२ सुवर्ण, १६ रौप्य अन् २३ कांस्य! भारतीय संघाने पटकावले 'टॉप फाईव्ह'मध्ये स्थान, जाणून घ्या पदकविजेत्यांची पूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 06:39 PM2022-08-08T18:39:56+5:302022-08-08T18:40:50+5:30
Commonwealth Games 2022 Medal tally : पी व्ही सिंधू, लक्ष्य सेन, अचंता शरथ कमल व सात्विक साईराज/चिराग शेट्टी या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी चार सुवर्णपदक जिंकून दिली.
Commonwealth Games 2022 Medal tally : पी व्ही सिंधू, लक्ष्य सेन, अचंता शरथ कमल व सात्विक साईराज/चिराग शेट्टी या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी चार सुवर्णपदक जिंकून दिली. पुरुष हॉकी संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पण, भारताने चार सुवर्णपदकाची भर घालून गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली. भारताने एकूण २२ सुवर्ण, १६ रौप्य व २३ कांस्यपदकांची कमाई करून ६१ पदकं नावावर केली आणि २० सुवर्णपदक जिंकणाऱ्या न्यूझीलंडला मागे टाकले. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व कॅनडा हे अव्वल तीन संघ ठरले. भारताने यापूर्वी २०१० दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वाधिक १०१ पदकं जिंकली होती, त्याआधी २००२ मध्ये ६९, २०१४मध्ये ६४ व २०१८ मध्ये ६६ अशी पदकं जिंकली होती.
भारताचे पदकवीर
सुवर्णपदक
मिराबाई चानू ( वेटलिफ्टिंग), जेरेमी लालरीनुंगा ( वेटलिफ्टिंग), अचिंता शेऊली ( वेटलिफ्टिंग), लॉन बॉल महिला सांघिक, पुरूष सांघिक टेबल टेनिस, सुधीर ( पॅरा पॉवरलिफ्टिंग), बजरंग पुनिया ( कुस्ती), साक्षी मलिक ( कुस्ती), दीपक पुनिया ( कुस्ती), रवी कुमार दहिया ( कुस्ती), विनेश फोगाट ( कुस्ती), नवीन मलिक ( कुस्ती), भाविना पटेल ( पॅरा टेबल टेनिस), नितू घांघास ( बॉक्सिंग), अमित पांघल ( बॉक्सिंग), एलडोस पॉल ( तिहेरी उडी), निखत जरीन ( बॉक्सिंग), मिश्र दुहेरी टेबल टेनिस, पी व्ही सिंधू ( बॅडमिंटन), लक्ष्य सेन ( बॅडमिंटन) , पुरुष दुहेरी ( बॅडमिंटन) , अचंथा शरथ कमल ( टेबल टेनिस)
𝘼𝙢𝙗𝙞𝙩𝙞𝙤𝙣. 𝙋𝙚𝙧𝙨𝙚𝙫𝙚𝙧𝙖𝙣𝙘𝙚. 𝙂𝙡𝙤𝙧𝙮.@Pvsindhu1 🏸🇮🇳#TeamIndia | #B2022 | 📸 @ghosh_anneshapic.twitter.com/XRJvbeoGKX
— Team India (@WeAreTeamIndia) August 8, 2022
रौप्यपदक
संकेत सरगर ( वेटलिफ्टिंग), बिंद्यारानी देवी ( वेटलिफ्टिंग), शुशिला लिकमबाम ( ज्युदो), विकास ठाकूर ( वेटलिफ्टिंग), मिश्र सांघिक ( बॅडमिंटन), तुलिका मान ( ज्युदो), मुरली श्रीशंकर ( लांब उडी), अंशु मलिक ( कुस्ती), प्रियांका गोस्वामी ( १०००० मीटर चालण्याची शर्यत), अविनाश साबळे ( ३००० मीटर स्टीपलचेस), लॉन बॉल पुरुष सांघिक, मिश्र दुहेरी ( टेबल टेनिस), महिला क्रिकेट, अब्दुल्ला अबूबाकेर ( तिहेरी उडी), सागर अहलावत ( बॉक्सिंग), पुरुष हॉकी संघ
𝗟𝗲𝗴𝗲𝗻𝗱 🏓👏👇
— Team India (@WeAreTeamIndia) August 8, 2022
Seven-time #CommonwealthGames 🥇 medallist @sharathkamal1 🇮🇳#EkIndiaTeamIndia | #TeamIndia | #B2022pic.twitter.com/TZAx4sGZoQ
कांस्यपदक
गुरुराजा पुजारी ( वेटलिफ्टिंग), विजय कुमार यादव ( ज्युदो), हरजिंदर कौर ( वेटलिफ्टिंग), लवप्रीत सिंग( वेटलिफ्टिंग), सौरव घोषाल ( स्क्वॉश), गुरदीप सिंग ( वेटलिफ्टिंग), तेजस्वीन शंकर ( उंच उडी), दिव्या काकरन ( कुस्ती), मोहित ग्रेवाल ( कुस्ती), जास्मिन ( बॉक्सिंग), पूजा गेहलोट ( कुस्ती), पूजा सिहाग ( कुस्ती), मोहम्मद हुस्सामुद्दीन ( बॉक्सिंग), दीपक नेहरा ( कुस्ती), सोनालबेन पटेल ( पॅरा टेबल टेनिस), रोहित टोकास ( बॉक्सिंग), महिला हॉकी, संदीप कुमार ( १०००० मीटर चालण्याची शर्यत), अन्नू राणी ( भालाफेक), मिश्र दुहेरी ( स्क्वॉश), श्रीकांत किदम्बी ( बॅडमिंटन), महिला दुहेरी ( बॅडमिंटन), साथियन ज्ञानसेकरन ( टेबल टेनिस).
🥈 medallists at the inaugural women's cricket competition at the #CommonwealthGames 👉 #TeamIndia#EkIndiaTeamIndia | #B2022pic.twitter.com/DorTgdw0ly
— Team India (@WeAreTeamIndia) August 7, 2022