Commonwealth Games 2022: महाराष्ट्राच्या मराठमोळ्या सुपुत्राने इतिहास घडविला! संकेत महादेव सरगरला 'राष्ट्रकुल'मध्ये रौप्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 03:42 PM2022-07-30T15:42:50+5:302022-07-30T15:52:15+5:30

Sanket Mahadev SARGAR, Commonwealth Games 2022 : सांगलीत छोटंस हॉटेल चालवणाऱ्या वडिलांचे डोळे आज अभिमानानं पाणावले.

Commonwealth Games 2022 : India win first medal, Maharashtra Weightlifter Sanket Mahadev SARGAR win SILVER in 55kg Men's categary with 248 kg | Commonwealth Games 2022: महाराष्ट्राच्या मराठमोळ्या सुपुत्राने इतिहास घडविला! संकेत महादेव सरगरला 'राष्ट्रकुल'मध्ये रौप्य

Commonwealth Games 2022: महाराष्ट्राच्या मराठमोळ्या सुपुत्राने इतिहास घडविला! संकेत महादेव सरगरला 'राष्ट्रकुल'मध्ये रौप्य

googlenewsNext

Sanket Mahadev SARGAR, Commonwealth Games 2022 : सांगलीत छोटंस हॉटेल चालवणाऱ्या वडिलांचे डोळे आज अभिमानानं पाणावले. महाराष्ट्राचा सुपूत्र संकेत महादेव सरगर याने राष्ट्रकुल स्पर्धेत २०२२ भारताला पहिले पदक जिंकून दिले. संकेतने ५५ किलो वजनी गटात भल्याभल्यांना पाणी पाजले. संकेतच्या पदकापूर्वी भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये १२५ पदकांची कमाई केली होती आणि  नेमबाजीनंतर ही सर्वोत्तम पदकसंख्या आहे. अखेरच्या प्रयत्नापर्यंत संकेत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर होता, परंतु त्याचा हाताचा कोपरा दुखावला अन् त्याचा १३९ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न फसला. १ किलोच्या फरकाने प्रतिस्पर्धी खेळाडूने सुवर्णपदक जिंकले अन् संकेतला रौप्यवर समाधान मानावे लागले.

श्रीलंकेच्या दिलंका इसुरू कुमार योदागेने स्नॅचमध्ये ( Snatch) पहिल्याच प्रयत्नात १०५ किलोचे लक्ष्य ठेवले होते आणि ते त्यांनी लिलया पेलले. पण, भारताचा संकेत आला अन् हवाच बदलून टाकली. त्याने पहिल्या प्रयत्नात १०७ किलो वजन उचलले. मलेशियाच्या बिन कॅस्डन मोहम्मद अनिकनेही १०७ किलो वजन उचलले. आता संकेतसमोर १११ किलोचे लक्ष्य होते. स्नॅचमध्ये भारतासमोर आता श्रीलंका व मलेशियन खेळाडूंचे आव्हान होते. संकेतने १११ किलोचे वजनही सहज उचलले. या कामगिरीसह संकेतने राष्ट्रकुल व राष्ट्रीय विक्रमही मोडला. मलेशियन खेळाडू दुसऱ्या प्रयत्नात अपयशी ठरला. स्नॅच प्रकारात ११३ किलो वजन उचलून संकेत अव्वल स्थानी राहिला.  


क्लिन अँड जर्कमध्ये ( Clean & Jerk ) संकेतने स्वतः समोर १३५ किलोचे लक्ष्य ठेवले होते, तर मलेशियन मोहम्मद अनिकने १४० किलोचे टार्गेट ठेवलेले. सुवर्णपदकाची थेट लढत ही संकेत व मोहम्मद याच्यातच होती. श्रीलंकेचा दिलंकाही पदकशर्यतीत होताच. दिलंकाने पहिल्या प्रयत्नात १२१ किलो वजन उचलले. संकेतने १३५ किलोचे वजन यशस्वी पार केले आणि २४८ किलोसह अव्वल स्थान कायम राखले. दुखापतीमुळे संकेतचे पुढील दोन १३९ किलो वजनाचे प्रयत्न अपयशी ठरले. मलेशियाच्या मोहम्मदने संकेतला आव्हान देण्याचा पूरेपूर प्रयत्न केला आणि त्याने शेवटच्या प्रयत्नात १४२ किलो वजन उचलून एकूण २४९ किलोसह सुवर्णपदक नावावर केले. संकेतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

२०२१ मध्ये राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत संकेत महादेव सरगरने ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता. महाराष्ट्रातील सांगली येथील त्याचा जन्म.. २१ वर्षीय संकेत कोल्हापूरमधील शिवाजी विद्यालयात इतिहास विषयाचा विद्यार्थी आहे.  संकेतचे वडील पान दुकान व छोटे हॉटेल चालवता.  

२०२०ची खेलो इंडिया युवा स्पर्धा आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेतील तो चॅम्पियन आहे.  यासह ५५ किलो वजनी गटातील राष्ट्रीय विक्रम ( स्नॅच प्रकारात १०८ किलो, क्लिन अँड जर्कमध्ये १३९ किलो असे एकूण २४४ किलो) त्याच्या नावावर आहे.
 

Web Title: Commonwealth Games 2022 : India win first medal, Maharashtra Weightlifter Sanket Mahadev SARGAR win SILVER in 55kg Men's categary with 248 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.