CWG 2022:१३० कोटी देशवासीयांच्या अपेक्षांचा 'भार' समर्थपणे पेलणारे शिलेदार; भारतासाठी पदक जिंकणारे वेटलिफ्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 10:33 AM2022-08-02T10:33:45+5:302022-08-02T10:36:08+5:30

इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.

Commonwealth Games 2022 Indian athletes have won seven medals in weightlifting so far | CWG 2022:१३० कोटी देशवासीयांच्या अपेक्षांचा 'भार' समर्थपणे पेलणारे शिलेदार; भारतासाठी पदक जिंकणारे वेटलिफ्टर्स

CWG 2022:१३० कोटी देशवासीयांच्या अपेक्षांचा 'भार' समर्थपणे पेलणारे शिलेदार; भारतासाठी पदक जिंकणारे वेटलिफ्टर्स

Next

बर्गिंहॅम : इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022) चे आयोजन करण्यात आले आहे, जिथे जगभरातील ७२ देशातील थलीट सहभागी झाले आहेत. भारतीय खेळाडूंनी देखील आपल्या देशाची शान वाढवत बर्गिंहॅमच्या धरतीवर तिरंगा फडकवला आहे. भारताला आतापर्यंत या स्पर्धेत एकूण ९ पदके मिळाली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे भारताने सर्वाधिक पदके वेटलिफ्टिंगमधून जिंकली आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या संकेत सरगरने रौप्य पदक पटकावून भारताचे खाते उघडले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताने एकूण सात पदक जिंकली आहेत. 

दरम्यान, वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या मीराबाई चानू, अंचिता शेऊली आणि युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे. १९ वर्षीय युवा खेळाडू जेरेमी लालरिनुंगाने ६७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. तर महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू हिने देशाला सुवर्णकमाई करून दिली. तसेच पुरूष वेटलिफ्टर संकेत सरगर आणि गुरूराजा पुजारी या दोघांनी भारताला अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकून दिले होते. भारतीय खेळाडूंकडून वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची लयलूट सुरूच आहे. कारण सोमवारी वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरने भारताला आणखी एक कांस्यपदक जिंकून दिले आहे. पश्चिम बंगालच्या देऊलपूर गावात मध्यमवर्गीय कुटुंबातील अंचिता शेऊली हिने भारतासाठी सुवर्ण भार उचलला होता. त्यामुळे वेटलिफ्टिंगमध्ये भारताने ३ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण सात पदके पटकावली आहेत. 

वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारे भारतीय खेळाडू 

  1. मीराबाई चानू (सुवर्ण पदक)
  2. जेरेमी लालरिनुंगा (सुवर्ण पदक) 
  3. अंचिता शेऊली (सुवर्ण पदक) 
  4. संकेत सरगर (रौप्य पदक) 
  5. बिंद्यारानी देवी (रौप्य पदक) 
  6. गुरूराजा पुजारी (कांस्य पदक) 
  7. हरजिंदर कौर (कांस्य पदक) 

 

भारतीय खेळाडूंचा डंका
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील संकेत महादेव सरगर याने भारतासाठी पहिले पदक जिंकले होते. अतिशय गरीब घरातून देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याने बर्गिंहॅममध्ये तिरंग्याची शान वाढवली. भारताने आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये नऊ पदके पटकावली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे यातील सात पदके वेटलिफ्टिंग मधून मिळाली आहेत. मराठमोळ्या संकेत सरगरने रौप्य पदक आणि गुरूराजा पुजारीने ६१ किलो वजन श्रेणीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. तसेच बिंद्यारानी देवीने रौप्य पदक जिंकले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत १३० पदके जिंकली आहेत. भारतापेक्षा जास्त पदके फक्त ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहेत. 

 

Web Title: Commonwealth Games 2022 Indian athletes have won seven medals in weightlifting so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.