Commonwealth Games 2022 : भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक, पुरुष संघाचा कॅनडावर ८-० असा दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 08:21 PM2022-08-03T20:21:50+5:302022-08-03T20:22:13+5:30
Commonwealth Games 2022 Hockey : भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी कॅनडाच्या पुरुष व महिला हॉकी संघावर विजय मिळवला.
Commonwealth Games 2022 Hockey : भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी कॅनडाच्या पुरुष व महिला हॉकी संघावर विजय मिळवला. महिलांनी ३-२ असा अटीतटीचा विजय मिळवताना सलग दुसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. पुरुष संघाने ८-० असा दणदणीत विजय मिळवून गटातील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली.
✅Dominance
— Hockey India (@TheHockeyIndia) August 3, 2022
✅Clean-sheet
✅3 points
✅It's good to be #TeamBlue 💙
IND 8:0 CAN #IndiaKaGame#HockeyIndia#B2022#Birmingham2022@CMO_Odisha@sports_odisha@IndiaSports@Media_SAIpic.twitter.com/rWHsOGVVxW
भारतीय पुरुष हॉकी संघाने B गटातील लढतीत कॅनडावर सुरुवातीपासून हल्लाबोल केला. सामन्याच्या सातव्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यात १०व्या मिनिटाला रो हिदास अमितने मैदानी गोल करून पहिल्या क्वार्टरमध्ये २-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने आक्रमणाची धार अधिक तीव्र करताना दुसरे क्वार्टरही गाजवले. दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमावल्यानंतर २०व्या मिनिटाला ललित कुमार उपाध्यायने कॉर्नरवर गोल केला. २७व्या मिनिटाला गुरजंत सिंगने मैदानी गोल करताना पहिल्या हाफमध्ये भारताची ४-० अशी आघाडी भक्कम केली.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये आकाशदीप सिंगने ३८व्या मिनिटाला मैदानी गोल करून भारताची आघाडी ५-० अशी नेली. अखेरच्या सत्रात भारताचे अनेक गोल प्रयत्न कॅनडाचे खेळाडू व गोलरक्षकांनी अडवले. ५६व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने आणखी एक गोल केला. दोन मिनिटांत मनदीप सिंगने मैदानी गोल करून भर घातली. अखेरच्या मिनिटाला आकाशदीपने आणखी एक गोल करून भारताचा ८-० असा विजय पक्का केला. पुरूष संघाला २०१० व २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकता आले होते.
#Hockey भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. गटातील अखेरच्या सामन्यात कॅनडावर ३-२ असा विजय मिळवून भारतीय महिलांनी ही झेप घेतली. २०१८नंतर पुन्हा भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. २००६नंतर भारतीय महिलांना राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकता आलेले नाही. आज झालेल्या A गटातील अखेरच्या साखळी सामन्यात सलिमा टेटे ने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला तिसऱ्या मिनिटाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. २२व्या मिनिटाला पेनल्टी शॉटवर गोल केला. कॅनडाकडून ब्रिएने स्टेअर्सने २३व्या मिनिटाला गोल करताना १-२ अशी पिछाडी कमी केली. ३९व्या मिनिटाला कॅनडाकडून हन्नाह हॉगनने बरोबरीचा गोल केला. ५१व्या मिनिटाला लालरेम्सिमीने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करताना भारताचा ३-२ असा विजय पक्का केला. महिला संघाने २००२ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि २००६मध्ये त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
𝐃𝐡𝐚𝐚𝐤𝐚𝐝 𝐖𝐢𝐧 🤜🤛
The Indian Women's Hockey Team seals their Semi-Final spot with a win over Canada in #CWG2022 🔥#BirminghamMeinJitegaHindustanHamara 🫶#B2022#SonySportsNetwork#SirfSonyPeDikhegapic.twitter.com/qb2S7qhKTn— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 3, 2022