Commonwealth Games 2022 : भारताच्या चौघींची क्रांती! लॉन बॉलमध्ये सुवर्णदकाचा 'Jack' पॉट; घडविला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 06:50 PM2022-08-02T18:50:40+5:302022-08-02T18:57:59+5:30

Commonwealth Games 2022 Lawn Bowls : लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रुपा राणी तिर्की या भारतीय महिलांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास घडविला.

Commonwealth Games 2022 Lawn Bowls Gold : History made in Birmingham! India won gold in the Lawn-bowls in Commonwealth Games 2022, beat South Africa | Commonwealth Games 2022 : भारताच्या चौघींची क्रांती! लॉन बॉलमध्ये सुवर्णदकाचा 'Jack' पॉट; घडविला इतिहास

Commonwealth Games 2022 : भारताच्या चौघींची क्रांती! लॉन बॉलमध्ये सुवर्णदकाचा 'Jack' पॉट; घडविला इतिहास

Next

Commonwealth Games 2022 Lawn Bowls : लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रुपा राणी तिर्की या भारतीय महिलांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास घडविला. लॉन बॉल ( Lawn Bowls) हा क्रीडा प्रकार कालपर्यंत भारतीयांच्या परिचयाचाही नव्हता, परंतु या चार महिलांनी ऐतिहासिक पदक निश्चित करताच याची चर्चा सुरू झाली. त्यात भारतीय महिलांनी सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कडवा संघर्ष मोडून काढताना १७-१० असा विजय मिळवला. CWG2022 भारताचे हे एकूण चौथे सुवर्णपदक ठरले. भारताच्या खात्यात ४ सुवर्ण, ३ रौप्य व ३ कांस्य अशी एकूण १० पदकं झाली आहेत आणि पदक तालिकेत ते सहाव्या क्रमांकावर आहेत. आफ्रिकेने २-८ अशा पिछाडीवरून १०-८ अशी आघाडी घेतली होती, परंतु अखेरच्या फेरीत भारतीय महिलांनी सॉलिड खेळ केला.  


उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर भारतीय महिलांना सुवर्णपदकाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागला. अंतिम फेरीत भारतीय महिलांनी गुणाचे खाते उघडून १-०अशी आघाडी घेतली. पण, आफ्रिकेने दुसऱ्या फेरीअंती २-१ अशी आघाडी मिळवली. तिसऱ्या फेरीत भारताने २-२ अशी बरोबरी मिळवून, नंतर ३-२ अशी आघाडी मिळवली. पाचव्या फेरीनंतर भारताने ही आघाडी ४-२ अशी वाढवून आफ्रिकेच्या गोटात चिंता निर्माण केली. सहाव्या फेरीनंतर भारताने ही आघाडी ७-२ अशी भक्कम करून सुवर्णपदक अन् त्यांच्यातले अंतर फारच कमी केले. 

सातव्या फेरीत भारताला १ गुण मिळवता आला, परंतु त्यांची आघाडी ८-२ अशी भक्कमच राहिली. आठव्या फेरीत आफ्रिकेने पिछाडी ४-८ अशी कमी केली. त्यामुळे आता नवव्या व अखेरच्या फेरीकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. अखेरच्या फेरीत आफ्रिकेने जबरदस्त खेळ केला, भारताला आघाडी कायम राखण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती. नवव्या फेरीत आफ्रिकेने ६-८ अशी चुरस निर्माण केली.  १०व्या फेरीत आफ्रिकन संघाचे चेंडू जॅक चेंडूच्या सर्वाधिक जवळ होते आणि त्यामुळे सामना ८-८ असा बरोबरीचा आला. ११व्या फेरीत पिंकीने कमालीचा चेंडू सरकवला अन् Jack च्या अगदी जवळ पोहोचवले. पण, ११व्या फेरीनंतर आफ्रिकेने १०-८ अशी आघाडी घेतली. 


आफ्रिकेच्या या पुनरागमनाने भारतीय खेळाडूंवर दडपण वाढलेले, प्रकर्षाने जाणवत होते. पण, १२व्या फेरीत भारताने १०-१० अशी बरोबरी मिळवली. आता उर्वरीत तीन फेऱ्यांमध्ये कोण वरचढ ठरतंय याची उत्सुकता होती. भारताने अपेक्षित १२-१० अशी आघाडी घेतली. त्यात १४व्या फेरीत आणखी गुणांची भर घालून भारताने आघाडी १५-१० अशी मजबूत केली. अखेरच्या फेरीत आघाडी वाढवून भारताने १७-१० असा विजय मिळवला.

लॉन बॉल कसा खेळतात, जाणून घ्या सोप्या भाषेत!
 

Jack ( पिवळा चेंडू) याच्या जितक्या जवळ आपला चेंडू पाठवता येईल, तितके संघाच्या फायद्याचे. 

Web Title: Commonwealth Games 2022 Lawn Bowls Gold : History made in Birmingham! India won gold in the Lawn-bowls in Commonwealth Games 2022, beat South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.