Commonwealth Games 2022 : सुवर्णही आमचे अन् रौप्यही!; एलडोस पॉल, अब्दुल्ला अबूबाकेर यांनी तिहेरी उडीत इतिहास घडविला; जगाला दणका दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 04:29 PM2022-08-07T16:29:47+5:302022-08-07T16:31:32+5:30
Commonwealth Games 2022 Men's Triple Jump - Final : नितू व अमित पांघल या बॉक्सर्सनी रविवारी भारताला दोन सुवर्णपदक जिंकून दिले.
Commonwealth Games 2022 Men's Triple Jump - Final : नितू व अमित पांघल या बॉक्सर्सनी रविवारी भारताला दोन सुवर्णपदक जिंकून दिले. महिला हॉकी संघानेही इतिहास घडविताना कांस्यपदकाची कमाई केली. त्यापाठोपाठ अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत प्रविण चित्रावेल, अब्दुल्ला अबूबाकेर व एलडोस पॉल यांची कामगिरी उल्लेखनीय झाली. पॉल व अब्दुल्ला यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. कांस्यपदकाच्या शर्यतीत प्रविणला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अन्यथा तीनही पदकं भारतीयांच्या खात्यात असते. मिल्खा सिंग, नीरज चोप्रा यांच्यानंतर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पॉल हा तिसरा भारतीय ठरला.
It's a Historical Gold & Silver for #IndianAthletics in the men's Triple Jump at the #CommonwealthGames2022 🇮🇳
— Athletics Federation of India (@afiindia) August 7, 2022
Eldhose Paul brings home the GOLD medal with a jump of 17.03m & Abdulla Aboobacker grabs the SILVER with an effort of 17.02m, Praveen Chithravel 16.89m finish fourth🫡 pic.twitter.com/Hrf9f8IPY6
तिसऱ्या राऊंड अखेरीस पॉल १७.०३ मीटरसह अव्वल स्थानावर होता, तर चित्रावेल १६.७५ मीटर व अब्दुल्ला १६.७१ मीटर अशा कामगिरीसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर होते. या तिघांमध्ये बर्म्युडाचा जाह-न्हाई पेरीनचिफ ( १६.९२ मी.) हा दुसऱ्या क्रमांकावर होता.
Eldhose Paul moves to Gold Medal position with that huge 17.03m jump in the final of Men's Triple Jump at the #CommonwealthGames2022@birminghamcg22pic.twitter.com/HpjXuZcOmr
— Athletics Federation of India (@afiindia) August 7, 2022
चौथ्या प्रयत्नात अब्दुल्लाला १६.७० मीटर तिहेरी उडी मारता आली, तर प्रविणने १६.६८ मीटर उडी मारली. पाचव्या प्रयत्नात अब्दुल्लाने १७.०२ मीटर तिहेरी उडी मारून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. प्रविणला पाचव्या प्रयत्नात १६.८५ मीटर उडी मारता आली. बर्म्युडाचा पेरीनचिफ अजूनही तिसऱ्या क्रमांकावर कायम होता. प्रविणला अखेरच्या प्रयत्नात चांगली कामगिरी करून कांस्यपदकाच्या शर्यतीत येण्याची संधी होती, परंतु त्याला १६.२८ मीटर तिहेरी उडी मारता आली. बर्म्युडाच्या पेरीनचिफला १६.९२ मीटर या कामगिरीसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आता सुवर्णपदकासाठी दोन भारतीयांमध्ये लढत होती. अब्दुल्लाने अखेरच्या प्रयत्नात