Commonwealth Games 2022 : Neeraj Chopra ची अनुपस्थिती पाकिस्तानच्या अर्षद नदीमच्या पथ्यावर पडली, जिंकले सुवर्ण; पाहा भारतीय कितव्या स्थानी आले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 01:36 AM2022-08-08T01:36:04+5:302022-08-08T01:36:55+5:30
Commonwealth Games 2022 Men's Javelin Throw - Final : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर भालाफेकीत पदक कोण जिंकेल याची उत्सुकता होती.
Commonwealth Games 2022 Men's Javelin Throw - Final : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर भालाफेकीत पदक कोण जिंकेल याची उत्सुकता होती. भारताचे डी पी मनू व रोहित यादव हे दोन स्पर्धक पुरुषांच्या भालाफेकीत आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज होते. नीरजच्या माघारीमुळे पाकिस्तानी भालाफेकपटू अर्षद नदीम याचं फावलं. त्याने ९०.१८ मीटर या स्पर्धा विक्रम व सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद करून सुवर्णपदक जिंकले. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.६४ मीटरसह रौप्य, तर केनियाच्या ज्युलियस येगोने ८५.७० मीटरसह कांस्य जिंकले. भारताचा डीपी मनू ( ८२.२८ मी.) व रोहित यादव ( ८२.२२ मी.) अनुक्रमे पाचवा व सहावा आला.
The record-breaking Historic 90.18m throw from Nadeem Arshad which made him first-ever South Asian athlete to cross the 90m barrier in Javelin.
— Nabeel Hashmi (@iNabeelHashmi) August 7, 2022
Even Anderson Peters was shocked with that colossal effort despite Nadeem having pain in his elbow.
GOLD loading In shaa Allah 🇵🇰 🇵🇰 pic.twitter.com/AdLhf7Bi48
#men4x100mRelay पुरूषांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत भारताला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुहम्मद अनास याहिया, मुहम्मद अजमल, नागनाथन पंडी व अमोज जेकब यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ३:०५.५१ मिनिटांची वेळ नोंदवली.
#Women's Javelin Throw महिलांच्या भालाफेकीत उत्तरप्रदेशच्या अन्नू राणीने कांस्यपदकाची कमाई केली. तिने चौथ्या प्रयत्नात ६० मीटर फेकलेला भाला हा पदकासाठी पुरेसा ठरला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या ( २०१९ दोहा) अंतिम फेरीत पात्र ठरणारी ती भारताची पहिली महिला भालाफेकपटू ठरली होती.
#Men's 10,000m Race Walk Final पुरुषांच्या अंतिम सामन्यात संदीप कुमार ( Sandeep Kumar) याने 38:49.21 मिनिटे अशी वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले.
#Triple Jump अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत एलडोस पॉल व अब्दुल्ला अबूबाकेर यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. पॉलने १७.०३ मीटर, तर अब्दुल्लाने १७.०२ मीटर लांब तिहेरी उडी मारली.
#Women4x100mRelay फायनलमध्ये दृती चंद, हिमा दास, सराबनी नंदा व ज्योती याराजी यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. पण, शर्थीचे प्रयत्न करूनही या संघाला ४३.८१ सेकंदाच्या वेळेसह पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नायजेरियाने ४२.१० सेकंदासह सुवर्ण, इंग्लंडने ४२.४१ सेकंदासह रौप्य व जमैकाने ४३.०८ सेकंदासह कांस्यपदक जिंकले.