Commonwealth Games 2022 : ४० वर्षीय शरथ कमलने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास; राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेे एकूण १३वे पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 05:58 PM2022-08-08T17:58:17+5:302022-08-08T17:58:34+5:30

Commonwealth Games 2022 Table Tennis : ४० वर्षीय शरथ कमनने ( Sharath Kamal) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या टेबल टेनिसच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात पदकाची कमाई केली.

Commonwealth Games 2022 Table Tennis : The 40-year-old grabs his 4th singles medal at the Commonwealth Games by clinching GOLD for India, beats England's Liam Pitchford | Commonwealth Games 2022 : ४० वर्षीय शरथ कमलने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास; राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेे एकूण १३वे पदक

Commonwealth Games 2022 : ४० वर्षीय शरथ कमलने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास; राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेे एकूण १३वे पदक

googlenewsNext

Commonwealth Games 2022 Table Tennis : ४० वर्षीय शरथ कमनने ( Sharath Kamal) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या टेबल टेनिसच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात पदकाची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धेतील त्याचे हे एकूण १३ वे पदक ठरले. यंदाच्या स्पर्धेत त्याने मिश्र दुहेरी, पुरुष सांघिक गटाचे सुवर्णपदक आणि पुरुष दुहेरीचे रौप्यपदक जिंकले आहे. आजच्या अंतिम सामन्यात शरथ कमलसमोर इंग्लंडच्या लिएम पिचफोर्डचे आव्हन होते. 

शरथला पहिला गेम ११-१३ असा गमवावा लागला, परंतु त्याने पुढील दोन गेम ११-७, ११-२ असे जिंकून २-१ अशी आघाडी घेतली. शरथने चौथा गेमही ११-६ असा जिंकला आणि सुवर्णपदकाच्या दिशेने मोठी झेप घेतली. शरथने पाचवा गेम ११-७ असा जिंकून ४-१ अशा फरकाने सुवर्णपदक नावावर केले. 


शरथ कमलने आतापर्यंत सहभाग घेतलेल्या प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे. टेबल टेनिस संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या शरथ कमलने आतापर्यंत ६ सुवर्ण, ३ रौप्य व ३ कांस्य अशी एकूण १२ पदकांची कमाई केली आहे. २००६मध्ये त्याने पुरुष एकेरीत व पुरुष सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले होते. २०१०मध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण, २०१८ व २०२२ मध्ये पुरूष सांघिक गटाचे सुवर्ण त्याच्या नावावर आहे. २०१४ व २०१८मध्ये पुरुष दुहेरीत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. २०१०मध्ये पुरुष सांघिक, २०१८मध्ये पुरुष एकेरी व २०१८ मिश्र दुहेरीत कांस्य जिंकले आहे. 

#TableTennis साथियन ज्ञानसेकरने पुरुष एकेरीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉकवर ११-९, ११-३, ११-५, ८-११, ९-११, १०-१२, ११-९ असा विजय मिळवला. ३-० अशी आघाडी असूनही भारतीय खेळाडूला सात गेम खेळावे लागले. इंग्लंडच्या खेळाडूने ३-३ अशी बरोबरी आणल्यानंतर अखेरचा गेम चुरशीचा झाला. पण, यात साथियनने बाजी मारली. 

Web Title: Commonwealth Games 2022 Table Tennis : The 40-year-old grabs his 4th singles medal at the Commonwealth Games by clinching GOLD for India, beats England's Liam Pitchford

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.