Commonwealth Games 2022 : सायकल-रिक्षा ओढणाऱ्या बापाच्या लेकाने केली कमाल; अचिंता शेऊलीने यशस्वीपणे उचलला 'सुवर्ण' भार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 01:26 AM2022-08-01T01:26:48+5:302022-08-01T01:29:10+5:30

Commonwealth Games 2022 Weightlifting : Achinta Sheuli won Gold राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताने सहावे पदक पक्के केले. मीराबाई चानू, जेरेमी लालरिंगनुन्गा ( सुवर्णपदक), संकेत सरगर, बिंद्यारानी देवी ( रौप्य) व गुरुराजा पुजारी ( कांस्य) यांनी आधी पदकं पटकावली.

Commonwealth Games 2022 Weightlifting : Achinta Sheuli won Gold, 20-year old Achinta breaks the all-time Commonwealth Games record (aggregate) in Men's 73 kg Weightlifting | Commonwealth Games 2022 : सायकल-रिक्षा ओढणाऱ्या बापाच्या लेकाने केली कमाल; अचिंता शेऊलीने यशस्वीपणे उचलला 'सुवर्ण' भार!

Commonwealth Games 2022 : सायकल-रिक्षा ओढणाऱ्या बापाच्या लेकाने केली कमाल; अचिंता शेऊलीने यशस्वीपणे उचलला 'सुवर्ण' भार!

googlenewsNext

Commonwealth Games 2022 Weightlifting  Achinta Sheuli - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताने सहावे पदक पक्के केले. मीराबाई चानू, जेरेमी लालरिंगनुन्गा ( सुवर्णपदक), संकेत सरगर, बिंद्यारानी देवी ( रौप्य) व गुरुराजा पुजारी ( कांस्य) यांनी आधी पदकं पटकावली. पश्चिम बंगालच्या देऊलपूर गावात मध्यम वर्गीय कुटूंबातील अचिंता शेऊली (  Abhineta Shaili)  याने आज भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने राष्ट्रकुल स्पर्धा विक्रमाचीही नोंद केली.

पश्चिम बंगालच्या देऊलपूर गावात मध्यम वर्गीय कुटूंबातील अचिंता शेऊली (  Abhineta Shaili)  याचा जन्म... २०२१ च्या ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ७३ किलो स्पर्धेत रौप्यपदक आणि राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील दोन सुवर्णपदकं त्याच्या नावावर आहेत. 

अचिंताचे वडील सायकल रिक्षा चालवून कुटुंब सांभाळायचे, परंतु अचिंता ८व्या इयत्तेत असताना त्यांचे निधन झाले. त्याच वेळी आणखी एक संकट शेऊली कुटुंबावर कोसळलं. त्यांच्या छोट्याशा कुकुट पालन फार्मवर कोल्ह्यांनी हल्ला केला. आर्थिक घडीच कोलमडून पडल्याने अचिंताचा मोठा भाऊ जो वेटलिफ्टर होता त्याने embroidery शिकली आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. अचिंतानेही शिवणकाम शिकले आहे.  

CWG2022 त अचिंताने ७३ किलो वजनी गटाच्या वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच ( Snach) प्रकारात सर्वोत्तम वैयक्तीक कामगिरीशी बरोबरी करताना १४३ किलो वजन उचलले. त्याने यासह राष्ट्रकुल स्पर्धा विक्रमही मोडला. स्नॅच प्रकारात अचिंताने १३७, १४० व १४३ असे भार उचलले. 

क्लिन अँड जर्क ( Clean & Jerk )मध्ये कॅनडाच्या शेड डॅरसिग्नीने १६३ किलो भार उचलून  एकूण २९८ किलोसह आघाडी घेतली होती. अचिंताने १६५ किलोचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. पण, लढतीत ट्विस्ट आला अन् मलेशियाच्या एरी हिदायत मोहम्मदने १६५ किलो भार उचलून ३०३ किलोसह टॉप स्थान पटकावले. अचिंताने १६६ किलो भार केला आणि तो लिलया पेलून ३०९ किलोसह अव्वल स्थानावर झेप घेतली. अचिंताने १६६ किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धा विक्रम केला.

अचिंता, मोहम्मद आणि ऑस्ट्रेलियाचा ब्रेंडन वोकलिंग यांच्यात शेवटची चुरस रंगली. अचिंताचा १७० किलोचा दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला. पण तिसऱ्या प्रयत्नात १७० किलो वजन उचलून त्याने एकूण ३१३ किलोसह सुवर्णपदक पक्के केले. 

Web Title: Commonwealth Games 2022 Weightlifting : Achinta Sheuli won Gold, 20-year old Achinta breaks the all-time Commonwealth Games record (aggregate) in Men's 73 kg Weightlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.