Commonwealth Games 2022 : भारताचा पदकाचा चौकार! बिंद्यारानी देवीने जिंकले रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 02:38 AM2022-07-31T02:38:25+5:302022-07-31T02:42:01+5:30

Commonwealth Games 2022 Weightlifting : Bindyarani Devi confirms 4th medal for India

Commonwealth Games 2022 Weightlifting : Bindyarani Devi confirms 4th medal for India, won Silver in the Women's 55 Kg weight category | Commonwealth Games 2022 : भारताचा पदकाचा चौकार! बिंद्यारानी देवीने जिंकले रौप्यपदक

Commonwealth Games 2022 : भारताचा पदकाचा चौकार! बिंद्यारानी देवीने जिंकले रौप्यपदक

googlenewsNext

Commonwealth Games 2022 Bindyarani Devi Sorokhaibam : महाराष्ट्राच्या संकेत सरगरने CWG2022 मध्ये भारताचे पदकाचे खाते उघडल्यानंतर वेटलिफ्टर्सनी पदकाचा चौकार मारला. मीराबाई चानूने सुवर्णपदकाची कमाई करून दिली. पुरुष वेटलिफ्टर संकेत सरगर आणि गुरूराजा पुजारी या दोघांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई करून दिली होती. त्यात महिलांच्या ५५ किलो वजनी गटात बिंद्यारानी देवीने ( Bindyarani Devi ) आणखी एक रौप्यपदक जिंकले. तिने क्लिन अँड जर्क मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वाधिक वजन उचलले. 

मणिपूरच्या या २३ वर्षीय वेटलिफ्टरने २०१९ च्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २०२१ मध्ये याच स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. २०२१ च्या जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत क्लिन अँड जर्क मध्ये तिने सुवर्ण जिंकले होते. 

आज झालेल्या फायनलमध्ये तिने स्नॅच प्रकारात अनुक्रमे ८१, ८४ व ८६ किलो वजन उचलले. कॅनडाच्या राचेल बेझिनेटने ८२ किलो भार उचलला. इंग्लंडची फ्रेएर मोरोव ८९ किलो वाजनासह आघाडीवर होती, परंतु नायजेरियाच्या एडिजेट ओलारिनोए हिने ९२ किलो वाजनासह गेम रिकॉर्ड केला. ९३ किलोचा तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला. 

क्लिन अँड जर्कमध्ये बिंद्यारानी देवीने स्वतः समोर १०५ किलोचे लक्ष्य ठेवले होते. पण अन्य स्पर्धकांची कामगिरी पाहून तिने लक्ष्य ११० किलो केले. तिने हा भार लीलया पेलला. नायजेरियन ओलारिनोएने १११ किलो वजन उचलून एकूण २०३ किलोचा स्पर्धा विक्रम नोंदवून सुवर्णपदक नावावर केले. इंग्लंडची मोरोव व भारताची बिंद्यारानी यांच्यात चुरस होती. बिंद्यारानीने ११६ किलो भार उचलून रौप्यपदक नावावर केले. तिने एकूण २०२ किलो वजन उचलले. १९८ किलोसह मोरोव ला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Web Title: Commonwealth Games 2022 Weightlifting : Bindyarani Devi confirms 4th medal for India, won Silver in the Women's 55 Kg weight category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.