Commonwealth Games 2022 : भारताच्या नवीनने पाकिस्तानी कुस्तीपटूला लोळवले, ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 11:10 PM2022-08-06T23:10:00+5:302022-08-06T23:11:01+5:30

Commonwealth Games 2022 Wrestling :  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी कुस्तीत दोन सुवर्णपदकं भारताने पटकावली. त्याशिवाय अॅथलेटिक्समध्ये दोन रौप्य, लॉन बॉलमध्ये रौप्य व कुस्तीतील एक कांस्य अशी पदकं जिंकली.

Commonwealth Games 2022 Wrestling India vs Pakistan : Naveen beats Pakistan's Muhammad Tahir to win the Gold Medal for India at Commonwealth Games 2022. | Commonwealth Games 2022 : भारताच्या नवीनने पाकिस्तानी कुस्तीपटूला लोळवले, ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले!

Commonwealth Games 2022 : भारताच्या नवीनने पाकिस्तानी कुस्तीपटूला लोळवले, ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले!

Next

Commonwealth Games 2022 Wrestling :  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी कुस्तीत दोन सुवर्णपदकं भारताने पटकावली. त्याशिवाय अॅथलेटिक्समध्ये दोन रौप्य, लॉन बॉलमध्ये रौप्य व कुस्तीतील एक कांस्य अशी पदकं जिंकली. रवी दहिया व विनेश फोगाट यांच्यानंतर नवीनच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष होते. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱ्या नवीनची अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास एकतर्फी होता आणि अंतिम सामन्याचा निकालही तसाच लागला. नवीनने सुवर्णपदक जिंकून भारतासाठी सहावे गोल्ड जिंकले आणि यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे कुस्तीतील ६वे सुवर्णपदक ठरले. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.  

७४ किलो वजनी गटात भारताच्या नवीनसमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या मुहम्मह ताहीरचे आव्हान होते. दोन्ही खेळाडू टांक पकडून पलटवार करण्यात महारथी होते. पाकिस्तानी कुस्तीपटू फार बचावात्मक खेळ करत असल्याने रेफरीने त्याला ताकिद दिली. नवीनने पाकिस्तानच्या खेळाडूला उचलून फेकले आणि २-० अशी आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांत नवीनने ही आघाडी कायम राखली होती. पिछाडीवर असूनही पाकिस्तानी मल्ल डिफेन्सीव्ह खेळताना दिसला. नवीनने पुन्हा एक डाव टाकून ५-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर आणखी एक भारंदाज डाव टाकून ९-० अशी आघाडी घेतली आणि बाजी मारली.  

#Wrestling ५३ किलो वजनी गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत विनेश फोगाटसमोर श्रीलंकेच्या चमोद्या केशानी मदुरावेलागेचे आव्हान होते. विनेशने पहिल्याच प्रयत्नात प्रतिस्पर्धीला पाठीवर टेकवण्याचा डाव टाकून ४-० अशी आघाडी घेतली. चमोद्याला विनेशची पकड सोडवता आली नाही आणि ती पूर्णपणे हतबल दिसली. विनेशने दीड मिनिटांत पक्के केले सुवर्णपदक. विनेशने २०१९च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे कांस्यपदक जिंकले आहे. शिवाय २०१४ व २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण, २०१८च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्ण व २०१४ चे कांस्यपदक तिच्या नावावर आहेत. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत विनेशने १ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कांस्यपदकं जिंकली आहेत.     

#Wrestling रवी दहियाने ( Ravi Kumar Dahiya ) ५७ किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीत एकहाती बाजी मारली. त्याने नायजेरीयाच्या वेल्सन एबिकेवेनिमोला पराभूत केले. वेल्सननेही राष्ट्रकुल स्पर्धेत दोन रौप्यपदक जिंकले आहेत आणि आजही त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. रवी दहिया प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाला होता आणि त्याने सुवर्णपदकाच्या लढतीत सुरुवातीला सावध खेळ करताना रवीने पकड करण्याचा प्रयत्न केला. रवीने जबरदस्त पकड करून नायजेरियाच्या खेळाडूला चार वेळा गिरकी घेण्यास भाग पाडून ८-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोन गुण घेत सुवर्णपदक पक्के केले.  

#Wrestling ५० किलो वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत पूजा गेहलोत व स्कॉटलंडच्या ख्रिस्टली लेमोफॅक यांच्यात लढत होती. स्कॉटलंडच्या खेळाडूने प्रथम दोन गुण घेतले. पण, पूजाने एक डाव टाकला अन् स्कॉटलंडच्या खेळाडूला चारवेळा गिरकी घेण्यास भाग पाडून ८-२ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत पुजाने लेक अटॅक करून आणखी ४ गुण घेत ही लढत १२-२ अशी जिंकली. २०१९च्या २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पूजाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी कुस्तीतीत आजचे दुसरे कांस्यपदक निश्चित केले. 

Web Title: Commonwealth Games 2022 Wrestling India vs Pakistan : Naveen beats Pakistan's Muhammad Tahir to win the Gold Medal for India at Commonwealth Games 2022.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.