Commonwealth Games 2022 : ऑलिम्पिक विजेत्या रवी दहियाने दोन मिनिटांत जिंकले सुवर्णपदक; नायजेरियाच्या मल्लाला केले चितपट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 10:06 PM2022-08-06T22:06:06+5:302022-08-06T22:06:26+5:30

Commonwealth Games 2022 Wrestling : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी विक्रमी कामगिरी केली

Commonwealth Games 2022 Wrestling :  Ravi Kumar Dahiya wins the Gold Medal after beating 2 time reigning CWG medalist 10-0 in Final (57kg). | Commonwealth Games 2022 : ऑलिम्पिक विजेत्या रवी दहियाने दोन मिनिटांत जिंकले सुवर्णपदक; नायजेरियाच्या मल्लाला केले चितपट

Commonwealth Games 2022 : ऑलिम्पिक विजेत्या रवी दहियाने दोन मिनिटांत जिंकले सुवर्णपदक; नायजेरियाच्या मल्लाला केले चितपट

Next

Commonwealth Games 2022 Wrestling : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी विक्रमी कामगिरी केली. शनिवारी पूजा गेहलोतने त्यात आणखी एका कांस्यपदकाची भर घातली.  रवी दहियाने ( Ravi Kumar Dahiya ) ५७ किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीत एकहाती बाजी मारली. त्याने नायजेरीयाच्या वेल्सन एबिकेवेनिमोला पराभूत केले. वेल्सननेही राष्ट्रकुल स्पर्धेत दोन रौप्यपदक जिंकले आहेत आणि आजही त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. 

रवी दहिया प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाला होता आणि त्याने सुवर्णपदकाच्या लढतीत सुरुवातीला सावध खेळ करताना रवीने पकड करण्याचा प्रयत्न केला. रवीने जबरदस्त पकड करून नायजेरियाच्या खेळाडूला चार वेळा गिरकी घेण्यास भाग पाडून ८-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोन गुण घेत सुवर्णपदक पक्के केले. 

रवी कुमार दहियाने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून इतिहास घडविला होता. त्यापूर्वी त्याने २०१९च्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते आणि तीन वेळा आशियाई विजेत्याचा मानही त्याने पटकावला आहे. २०२०, २०२१ व २०२२ अशा सलग तीन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. हरयाणाच्या या कुस्तीपटूने १०व्या वर्षापासून खेळण्यास सुरुवात केली. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रवी कुमार दहीयाने वडीलांची मेहनत सार्थ ठरवली. त्याचे वडील राकेश दहिया हे शेतकरी आहेत आणि मुलाला रोज ताजं दुध व फळं मिळावीत यासाठी ते घरापासून स्टेडियमपर्यंत असा ३९ किलोमीटरचा प्रवास करायचे. दहा वर्षांहून अधिक काळ त्यांचा हा दिनक्रम सुरू होता. २०२१मध्ये रवी कुमार दहियाला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

#Wrestling ५० किलो वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत पूजा गेहलोत व स्कॉटलंडच्या ख्रिस्टली लेमोफॅक यांच्यात लढत होती. स्कॉटलंडच्या खेळाडूने प्रथम दोन गुण घेतले. पण, पूजाने एक डाव टाकला अन् स्कॉटलंडच्या खेळाडूला चारवेळा गिरकी घेण्यास भाग पाडून ८-२ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत पुजाने लेक अटॅक करून आणखी ४ गुण घेत ही लढत १२-२ अशी जिंकली. २०१९च्या २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पूजाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी कुस्तीतीत आजचे दुसरे कांस्यपदक निश्चित केले. 
 

Web Title: Commonwealth Games 2022 Wrestling :  Ravi Kumar Dahiya wins the Gold Medal after beating 2 time reigning CWG medalist 10-0 in Final (57kg).

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.