राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकींची छाप, रेश्माला सुवर्ण तर सोनालीला रौप्यपदक
By admin | Published: November 5, 2016 04:25 PM2016-11-05T16:25:48+5:302016-11-05T16:25:48+5:30
राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत पैलवान रेश्मा माने आणि सोनाली तोडकर यांनी पहिल्याच दिवशी सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवत महाराष्ट्राची शान वाढवली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
सिंगापूर, दि. 5 - राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच दिवसावर महाराष्ट्राची छाप पडली. कुस्तीमध्ये भारताच्या दोन महिला कुस्तीपटूंनी पदक मिळवलं असून दोघी महाराष्ट्रातील आहेत. पैलवान रेश्मा माने आणि सोनाली तोडकर यांनी पहिल्याच दिवशी सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवत महाराष्ट्राची शान वाढवली आहे.
सिंगापूरमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. पैलवान रेश्मा मानेने महिलांच्या 63 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं असून सोनाली तोडकरने 58 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली आहे.
रेश्माने सिंगापूरच्या चर्मायनी हुगीटिव्हाना आणि भारताच्याच गार्गी यादवला मात देत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं आहे. तर अंतिम फेरीत सोनालीला भारताच्या मंजूकडून हार पत्करावी लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.