बेंगळुरूच्या तुलनेत पुण्यातील झेल उत्तम : साहा
By admin | Published: March 13, 2017 03:32 AM2017-03-13T03:32:48+5:302017-03-13T03:32:48+5:30
पुणे येथे रिद्धिमान साहाने हवेत सूर मारत झेल टिपला आणि स्टीव्ह ओकीफेला तंबूचा मार्ग दाखवला होता. हा सर्वोत्तम झेल होता, अशी प्रतिक्रिया भारतीय यष्टिरक्षकाने व्यक्त केली आहे.
कोलकाता : पुणे येथे रिद्धिमान साहाने हवेत सूर मारत झेल टिपला आणि स्टीव्ह ओकीफेला तंबूचा मार्ग दाखवला होता. हा सर्वोत्तम झेल होता, अशी प्रतिक्रिया भारतीय यष्टिरक्षकाने व्यक्त केली आहे.
एका कार्यक्रमानिमित्त येथे आलेला साहा पत्रकारांसोबत बोलताना म्हणाला,‘ज्यावेळी लोक माझी तुलना ‘सुपरमॅन’सोबत करतात त्यावेळी मला आनंद होतो. पण खरे बघता मी जर सुपरमॅनच्या तुलनेत किमान १० टक्के जरी कामगिरी करू शकलो तरी चांगले राहील. मी कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहो.’
पुणे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतील पराभवादरम्यान साहाने डावातील ८१ व्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर शानदार झेल टिपत ओकीफेला तंबूचा मार्ग दाखविला होता.
साहा म्हणाला, ‘बेंगळुरूच्या तुलनेत पुण्यातील झेल कठीण होता. पहिल्या लढतीत प्रतिक्रिया देण्यास वेळ कमी होता. कारण तो वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीवर झेल उडालेला होता.’(वृत्तसंस्था)